Marathi News : ब्रह्मांडात दूरवरून येणारे रहस्यमय सिग्नल नोंदवण्यात आले असून, ते सिग्नल पृथ्वीवर पोहोचायला तब्बल आठ अब्ज वर्षे लागल्याचा दावा खगोल शास्त्रज्ञांनी केला आहे. या ‘फास्ट रेडिओ बर्स्ट’ किंवा एफआरबी लहरी म्हणजे एलियनने पाठवलेले संदेश आहे की काय याचा संशोधक शोध घेत आहे.
जर्नल सायन्समध्ये प्रकाशित झालेल्या पेपरनुसार, ‘फास्ट रेडिओ बर्स्ट’ किंवा एफआरबी, ही एक वैश्विक घटना आहे. या एफआरबी रेडिओ लहरी तीव्र परंतु लहान लहरी असून, आपल्या मोबाइल फोन किंवा मायक्रोवेव्हद्वारे उत्सर्जित होणाऱ्या रेडिएशनसारख्याच त्या असतात,
अत्यंत दुर्मिळ एफआरबी तथापि, विश्वातील दूरच्या स्त्रोतांपासून उद्भवतात. संवेदनशील रेडिओ, टेलिस्कोप आणि संगणकीय प्रणाली असूनही, एफआरबी लहरी शोधणे खगोलशास्त्रज्ञांसाठी आव्हानात्मक आहे.
स्विनबर्न युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीच्या नवीन अभ्यासाचे लेखक रायन रॉनन यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, एफआरबी लहरी सेकंदाचा फक्त एक छोटासा भाग टिकतात, बहुतेक एफआरबी पुन्हा पुन्हा होत नाहीत, याचा अर्थ ते काय आहेत किंवा ते कोठून आले आहेत हे समजून घ्यायचे असेल,
तर त्यांना त्वरित प्रतिक्रिया देणे आवश्यक आहे आणि ते पृथ्वीजवळून जात असताना एका सेकंदाच्या काही हजाराव्या भागामध्ये ते शोधणे आवश्यक असल्याने त्यासाठी शक्य तितकी माहिती गोळा करावी लागणार आहे.
अशा एफआरबी लहरींना २०२२०३१० ए म्हणूनही ओळखले जात असून, आतापर्यंतचे रेकॉर्ड केलेल्या सर्वात विशिष्ट आणि प्राचीन आणि विलक्षण उच्च ऊर्जाच्या लहरी आठ अब्ज वर्षांपूर्वीच्या असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे.
खगोलशास्त्रज्ञांनी आजपर्यंत अशा केवळ ५० तीव्र परंतु लहान लहरी शोधल्या आहेत. हे नमुने कमी असल्याने, त्यांचा अभ्यास करणे खूप आव्हानात्मक आहे. एफआरबीचा उगम मॅग्नेटर्सरपासून अर्थात उच्च चुंबकीय न्यूट्रॉन ताऱ्यांपासून होत असल्याचे काही अभ्यासातून समोर येत असले
तरी एफआरबीचा स्त्रोत अद्याप एक गूढ आहे. त्यांच्या उत्पत्तीचे कारण काय आहे? हे ठरवणे खूपच कठीण असून त्यासाठी संशोधकांना आढळलेल्या एफआरबीचा वापर केला जात आहे.