Post Office : तुम्ही सध्या स्वतःसाठी पोस्टाच्या चांगल्या गुंतवणूक योजना शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकणी आहात. आज आम्ही तुम्हाला पोस्टाच्या सर्वोत्तम योजना सांगणार आहोत जिथे गुंतवणूक करून तुम्ही उत्तम कमाई करू शकता. पोस्टाच्या गुंतवणुकीत तुम्हाला हमी परतावा आणि सरकारी हमी मिळते. याचा अर्थ पैसे वाढण्याची हमी आणि बुडण्याचा धोका नाही. गुंतवणुकीचे हे ठिकाण लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी उत्तम आहे.
आजकाल पोस्ट ऑफिस स्कीम्सवर देखील चांगले परतावा मिळत आहेत. अलीकडे सरकारने काही योजनांच्या व्याजातही बदल केले आहेत. याशिवाय काही योजनांचे नियमही बदलण्यात आले आहेत. कोणत्या पोस्ट ऑफिस बचत योजना सर्वोत्तम आहेत आणि किती परतावा मिळत आहे, तसेच कोणत्या स्कीममध्ये तुमचे पैसे किती दिवसात दुप्पट होऊ शकतात. ते जाणून घेऊया.
पोस्ट ऑफिस बचत खाते
तुम्ही देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये बचत खाते उघडू शकता. खात्यात ठेवलेल्या ठेवींवर तुम्हाला निश्चित व्याज मिळते. ज्यांना निश्चित परतावा हवा आहे त्यांच्यासाठी ही योजना योग्य आहे. विशेष म्हणजे खाते उघडण्यासाठी फक्त 500 रुपये आवश्यक आहेत. येथिक व्याजदर 4.00% इतके आहे.
पोस्ट ऑफिस राष्ट्रीय बचत आवर्ती ठेव खाते (RD)
तुम्ही पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट खात्यात 5 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. येथे तुम्हाला चक्रवाढ व्याजाचा लाभही मिळतो. पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग्ज स्कीममध्ये एकूण 60 हप्त्यांमध्ये पैसे जमा करावे लागतात. ज्यांना दर महिन्याला गुंतवणूक करायची आहे त्यांच्यासाठी ही योजना चांगली आहे. आरडी येथील व्याजदर 6.20% इतके आहे.
पोस्ट ऑफिस राष्ट्रीय बचत वेळ ठेव खाते (TD)
पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट खाते ही पोस्ट ऑफिसच्या सर्वात लोकप्रिय बचत योजनांपैकी एक आहे. या योजनेवरील व्याज अर्थ मंत्रालय ठरवते. योजनेत, एकल खाते, संयुक्त खाते किंवा अल्पवयीन मुलांसाठी (10 वर्षांपेक्षा जास्त) पालकांच्या देखरेखीखाली उघडले जाऊ शकते. सरकारने 1 एप्रिल 2023 रोजी पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीमच्या व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सची वाढ केली आहे. येथे तुम्ही 1000/- रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. येथे व्याजदर वर्षानुसार लागू होतात.
पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना खाते (MIS)
पोस्ट ऑफिस मासिक बचत योजना (MIS), नियमित उत्पन्नाचा एक चांगला स्रोत. सरकारी हमी आहे. शिवाय व्याजही चांगले आहे. सरकार दर तिमाहीत व्याजाचा आढावा घेते आणि पुढील तिमाहीसाठी व्याजदर ठरवते. POMIS चा लॉक-इन कालावधी 5 वर्षांचा आहे. मॅच्युरिटी झाल्यावर, गुंतवणूकदाराला संपूर्ण पैसे काढण्याचा किंवा तोच पैसा पुन्हा गुंतवण्याचा पर्याय असतो. अर्थसंकल्प 2023 मध्ये, सरकारने व्यक्तींसाठी ठेव मर्यादा 9 लाख रुपये केली. त्याच वेळी, तुम्ही संयुक्त खात्यात 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)
पोस्ट ऑफिस ज्येष्ठ नागरिक बचत योजना हा ज्येष्ठ नागरिकांसाठी चांगला पर्याय आहे. भारत सरकारची हमी योजना. ठेवीदारांना नियमित उत्पन्नाची हमी मिळते. ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) मध्ये, नियमित उत्पन्न म्हणजे व्याज भरणे. प्रत्येक तिमाहीचे व्याज मोजले जाते आणि गुंतवणूकदारांच्या खात्यात जमा केले जाते. व्याजाचाही त्रैमासिक आधारावर आढावा घेतला जातो. येथे तुम्ही किमान 1000/- रुपयांपासून गुंतवणूक करू शकता. येथील व्याजदर 8.20%
इतके आहेत.