अहमदनगरमधील १ कोटीचे लाच प्रकरण : एक कोटीत ‘बडे’ लोक वाटेकरी..वेगळाच खुलासा..वाचा सविस्तर

Ahmednagarlive24
Published:

Ahmednagar News : अहमदनगर मध्ये एमआयडीसी मधील अभियंत्यांच्या एक कोटीच्या लाच प्रकरणाची माहिती समोर आली अन महाराष्ट्रात खळबळ उडाली. यातील आरोपी अमित गायकवाड हा ताब्यात आहे तर गणेश वाघ मात्र फरार आहे.

गायकवाडकडून सध्या तरी काही विशेष माहिती मिळाली नाही. परंतु मुख्य सूत्रधार वाघ हाती लागल्यानंतरच तपासाला गती मिळेल असे पोलीस सांगतायत. परंतु या घटनेमागील अनेक पैलू समोर येत असून ते देखील धक्कादायक आहेत.

विविध जिल्ह्यात मुख्य आरोपीचा शोध

या गुन्ह्यातील मुख्य आरोपी गणेश वाघ हा अद्याप फरार आहे. तो मूळचा बुलढाणा जिल्ह्यातील चिंचोली येथील असून, सध्या तो धुळे येथील एमआयडीसी कार्यालयात कार्यरत आहेत. तो नगर येथील एमआयडीसीत होता. त्यापूर्वी तो छत्रपती संभाजीनगर एमआयडीसीत होता.

तक्रारदार हादेखील छत्रपती संभाजीनगर येथील असून, त्याचे व तक्रारदार याचे तो संभाजीनगर येथे असल्यापासूनचे संबंध आहेत. त्याच्या सांगण्यावरुनच गायकवाड याने तक्रारदार याच्याकडून एक कोटी रुपये घेतले. परंतु अद्यापही त्याचा शोध लागेना. पोलीस पथक सध्या विविध जिल्ह्यात त्याचा शोध घेत आहे.

गायकवाडचा धक्कादायक खुलासा !

सात वर्षांपूर्वी अमित गायकवाड हा एमआयडीसीत सहायक अभियंता म्हणून रुजू झालेला होता. पथकाने जेव्हा त्याच्या घराची झडती घेतली तेव्हा संसारोपयोगी वस्तू सोडल्या तर काही विशेष आढळले नाही. त्यावेळी गायकवाडने पहिल्यांदाच लाच घेतली अशी कबुली दिली.

तक्रारदार व वाघ यांची एकत्रित भागीदारी होती ?

तक्रारदार हा छत्रपती संभाजीनगर येथील आहे. तो कंत्राटदार आहे. तो पाईपलाईन बदलण्यासह रस्ते व गटारींचीही कामे पूर्वीपासून घेत आलेला आहे. मुख्य आरोपी वाघ छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत झाल्यापासून तक्रारदार हा एमआयडीसीत कामे घेतो.

तो व वाघ हे दोघे पार्टनर होते अशी चर्चा एमआयडीसीत रंगलेली आहे. मग जर ते दोघे पार्टनर होते तर मग बिनसले कुठे? नेमके काय घडले असावे असावी प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एक कोटीमध्ये बडे लोक वाटेकरी ?

एक कोटी रुपये लाच स्वीकारल्याच्या घटनेने राज्यात खळबळ उडाली. ही रक्कम गायकवाडने स्वीकारली असली तरी त्यात अनेक लोक वाटेकरी असावेत असा अंदाज आहे.

महामंडळाच्या बांधकाम विभागात सहायक अभियंता, उपअभियंता, कार्यकारी आणि मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंता, हे अधिकारी कार्यरत असतात. गायकवाडने जरी वाघ याचे नाव सांगितले असले तरी वाघ हाती लागल्यानंतर तो आणखी सांगतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. यात आणखी कोणी वाटेकरी असू शकेल अंदाज वर्तवला जात आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe