Precaution From Snake : घराजवळ ‘ही’ सहा झाडे असतील तर साप कधीच येणार नाही ! पहा कोणती आहेत झाडे

Published on -

Precaution From Snake:-नुसते साप म्हटले तरी आपल्या अंगावर काटा उभा राहतो व भीतीने अंगावर शहारे उभे राहतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा इतर वेळेस देखील बऱ्याचदा घरामध्ये साप शिरण्याच्या घटना घडतात.

घरामध्ये जर साप शिरला तर त्याला बाहेर काढणे किंवा त्याला शोधणे खूप जिकिरीचे होऊन बसते. कधी कधी आपल्याला कळत देखील नाही की साप घरात शिरला आहे की नाही व यामुळे बऱ्याचदा सर्पदंश होण्याचा धोका देखील वाढतो.

घराच्या अवतीभवती काडी कचरा किंवा पाणी साचले असेल किंवा बेडूक, उंदीर यासारखे सापाचे खाद्य म्हणून ओळखले जाणारे प्राण्यांचा वावर घराच्या अवतीभवती असेल तर साप अशा ठिकाणी हमखास येतातच.

त्यामुळे घरामध्ये साप शिरू नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही घराच्या समोर किंवा अवतीभवती काही महत्त्वाच्या वनस्पतींची लागवड करणे गरजेचे आहे. जर तुम्ही या वनस्पती घराच्या समोर किंवा अवतीभवती लावल्या तर साप चुकून देखील घरात शिरणार नाही. या अनुषंगाने त्या वनस्पती नेमक्या कोणत्या आहेत याबद्दलचीच महत्त्वाची माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

घराजवळ लावा या वनस्पती आणि घरापासून सापांना ठेवा दूर

1- झेंडू- झेंडू एक फुलझाड आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. परंतु झेंडू वनस्पती ही उत्कृष्ट सर्प विरोधक म्हणून ओळखले जाते. झेंडूच्या फुलांचा सुगंध सापांना घाबरवण्यासाठी खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या घराच्या आसपास साप येऊ नये त्याकरिता तुम्ही झेंडूची लागवड करणे गरजेचे आहे.

2- स्नेक प्लांट- या वनस्पतीला सासूबाईंची जीभ किंवा स्नेक प्लांट असे देखील म्हणतात. या वनस्पतीची दिसणारी लांब, टोकदार पानांवरून या वनस्पतीला स्नेक प्लांट असे नाव पडले आहे. ही वनस्पती असा वास सोडते की सापांना झटक्यात पळवून लावते. त्यामुळे घराजवळ जर ही वनस्पती असेल तर साप घराच्या जवळ फिरकत देखील नाही.

3- कांदा- कांद्याच्या उग्र वास देखील सापांना घरापासून दूर ठेवण्यासाठी मदत करतो. जर घरातील बागेमध्ये जर तुम्ही कांदा लावला असेल तर तुमच्या घराच्या आजूबाजूला साप फिरत नाही किंवा त्यांना घरात यायला अडथळा निर्माण होऊ शकतो.

4- भारतीय स्नेक रूट- इंडियन स्नेक रूट किंवा देवी मिरपूड ही एक औषधी वनस्पती असून सापांना विरोधक म्हणून वापरली जाते. या वनस्पतीच्या मुळातून अतिशय तीव्र स्वरूपाचा वास येतो व त्यामुळे साप घरापासून दूर राहतात.

5- गवती चहा- गवती चहा म्हणजेच लेमन ग्रास ही एक आणखी महत्वपूर्ण वनस्पती असून या वनस्पतीच्या तीव्र सुगंधामुळे साप घराच्या अवतीभवती फिरत नाही. गवती चहाला लिंबूवर्गीय वास येत असल्यामुळे साप घरापासून दूर ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरतो.

6- लसुन- लसूण हा त्याच्या तिखट वासासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे लसुन देखील साप विरोधक समजला जातो. जर तुम्ही तुमच्या घराच्या अवतीभवती लसणाची लागवड केली तर त्याच्या वासामुळे साप तुमच्या घरापासून दूर ठेवण्यास मदत होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News