भरदिवसा वृद्ध महिलेचे दीड तोळे सोने लुटले

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदा : तालुक्यातील देऊळगाव गलांडे येथे श्रीगोंदा- मांडवगण रस्त्यावर आज सायंकाळी पाच वाजता नातीसह घरी जाणाऱ्या ८० वर्षांच्या वृद्ध महिलेच्या गळयातील दीड तोळे सोन्याचे मणी हिसकावून नेले.

चोरटयांनी ज़ोराचा हिसका दिल्याने रस्त्यावर पडून ही वृद्ध महिला किरकोळ जखमी झाली आहे. लुटमार करणारा चोरटा पळताना दुचाकीला धडकल्यामुळे नागरिकांच्या तावडीत सापडला व लोकांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

चोरट्याने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील एकजण गंभीर जखमी झाला आहे. तालुक्यातील देऊळगाव गलांडे येथील वत्सला बापूराव धारकर (वय ८०वर्षे) या नातीसोबत सायंकाळी पाच वाजता घरी जात होत्या.

श्रीगोंदा -मांडवगण रस्त्यावर नदीच्या पुलावरून जात असताना दुचाकीवर आलेल्या भामटयाने रस्ता विचारण्याचा बहाणा करून वृद्ध महिलेच्या गळयातील ३० हज़ार रुपये किंमतीचे सोन्याचे डोरले हिसकावून पळाला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment