LIC Policy : एलआयसी ही देशातील सर्वात जुनी आणि मोठी विमा कंपनी आहे. एलआयसीकडे अनेक एलआयसी पॉलिसी उपलब्ध आहेत. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी एलआयसी एकापेक्षा एक योजना राबवते. अशातच या वर्षी जानेवारीमध्ये LIC कडून एक नवीन योजना सुरू करण्यात आली, तिचे नाव आहे LIC जीवन आझाद पॉलिसी असे आहे. ही योजना सुरक्षितता लक्षात घेऊन तयार करण्यात आली आहे.
या योजनेची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की ग्राहकांना सुरक्षितता आणि बचत या दोन्ही गोष्टींचा लाभ घेता येईल. या पॉलिसीमध्ये, पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, एलआयसीची ही पॉलिसी नॉमिनीला मृत्यू लाभ देईल आणि जर पॉलिसीधारक या पॉलिसीच्या शेवटपर्यंत जिवंत राहिला, तर एलआयसी त्याला परिपक्वता लाभ देईल.
पॉलिसीचे फायदे :-
या पॉलिसीनुसार, पॉलिसीधारकाचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास, पॉलिसीची रक्कम नॉमिनीला दिली जाईल. मृत्यू झाल्यास, पॉलिसीच्या रकमेपेक्षा जास्त किंवा वार्षिक प्रीमियमच्या 7 पट असेल.
परिपक्वतेमध्ये अधिक फायदा
या योजनेनुसार, पॉलिसीधारक पॉलिसीच्या समाप्तीपर्यंत जिवंत राहिल्यास, पॉलिसी कंपनी परिपक्वतेवर पॉलिसीधारकाला पॉलिसीची रक्कम देईल.
कर लाभ
या पॉलिसीमध्ये तुम्ही जो काही प्रीमियम जमा केला असेल, त्यावर तुम्ही कराचा लाभ देखील घेऊ शकता. यामध्ये, आयकर कलम 80C अंतर्गत प्रीमियमवर कर लाभाचा दावा केला जाऊ शकतो. याशिवाय, परिपक्वता किंवा मृत्यूनंतर प्राप्त झालेल्या रकमेतून कलम 10D अंतर्गत सूट घेतली जाऊ शकते.
पात्रता काय ?
या पॉलिसीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमचे किमान वय 90 दिवस आणि कमाल 50 वर्षे आहे. मॅच्युरिटीबद्दल बोलायचे झाले तर, ते किमान १८ वर्षे आणि कमाल ५० वर्षे होते. तर LIC च्या या पॉलिसीमध्ये किमान प्रीमियम 2 लाख रुपये आणि कमाल प्रीमियम 5 लाख रुपये आहे.