SIDBI Recruitment 2023 : सध्या तुम्ही मुंबईत नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम संधी चालून आली आहे. भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) अंतर्गत सध्या विविध पदांवर भरती सुरु असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी तुम्ही तुमचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकता. भरती संबंधित अधिक माहिती खालीलप्रमाणे-
भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI) अंतर्गत “सहाय्यक व्यवस्थापक” पदाच्या एकूण 50 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. तर येथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावेत.
भरती संबंधित अधिक माहिती :-
पदाचे नाव
वरील भरती अंतर्गत सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
पद संख्या
या भरती अंतर्गत एकूण ५० जागा भरल्या जाणार आहेत.
शैक्षणिक पात्रता
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.
नोकरी ठिकाण
ही भरती मुंबई येथे होत आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी अर्ज करण्याची वयोमर्यादा 40 वर्षे इतकी आहे.
अर्ज पद्धती
या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागवले जात आहेत.
अर्ज करण्याची शेवटची तारीख
वरील पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे.
निवड प्रक्रिया
या भरतीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार आहे.
अधिकृत वेबसाईट
भरती संबंधित अधिक माहितीसाठी www.sidbi.in या वेबसाईटला भेट द्या.
असा करा अर्ज
-वरील पदांसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
-उमेदवारांनी अर्ज https://ibpsonline.ibps.in/sidbioct23/ या वेबसाईटद्वारे करायचे आहे.
-अर्ज वर दिलेल्या लिंकद्वारेच सादर करायचे आहेत.
-अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
-अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2023 आहे.
-अर्ज देय तारखेपूर्वी सादर करावेत, ननंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्ज सादर करण्यापूर्वी भरती सूचना काळजीपूर्वक वाचावी.