Ahmednagar Politics : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ४५ प्लस खासदार निवडून येणार – माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले

Ahmednagarlive24 office
Published:
Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : राहुरी तालुका विधानसभा मतदार संघातील विकास कामांच्या माध्यमातून जनतेशी नाळ जोडली गेली असल्यामुळे मतदारांनी आमच्यावर विश्वास ठेवून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात भाजपचा झेंडा फडकविला आहे.

मी आमदार नसतानाही जनतेच्या सुख दुःखामध्ये व विकासाच्या योजना गाव पातळीवर घेऊन जाण्याचे काम करत आहे. राज्यातील महायुतीचे सरकार व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून विकासाच्या योजना खऱ्या अर्थाने मार्गी लागत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजपा एक नंबरचा पक्ष असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ४५ प्लस खासदार निवडून येणार आहेत.

नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचे काम करावे, जनतेने टाकलेला विश्वास सार्थ ठरवावा असे प्रतिपादन माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले. नवनिर्वाचित सरपंच सदस्यांचा सत्कार माजीमंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी एकनाथ आटकर, विजय शेवाळे, श्याम पिंपळे, पोपट ढगे, रामदास सोनवणे, नंदू पालवे, पीएस बोरकर, दादाभाऊ चितळकर, नाना बोरकर, रेणुका गावडे, राजू घोरपडे, निवडणूक प्रभारी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड,

ज्ञानेश्वर भिंगारदे, राजू बेल्हेकर, बाळकृष्ण गावडे, संदीप मोहोळ, संजय पवार, रभाजी गावडे आदी उपस्थित होते. वडगाव गुप्ता, हिंगणगाव, मेहकरी, देऊळगाव सिद्धी, निंबोडी, दिग्रस, चिचोंडी शिराळ, आदी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

दरम्यान, राहुरी तालुक्यातील २२ ग्रामपंचायत निवडणुकीपैकी १३ ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला असून चार ग्रामपंचायतीवर स्थानिक आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. तसेच नगर तालुक्यातील आठ ग्रामपंचायतीपैकी सहा ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा फडकला आहे, त्याचबरोबर पाथर्डी तालुक्यातील आठ ग्रामपंचायत

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe