LIC Policy : LIC ही देशातील सर्वात मोठी आणि जुनी विमा कंपनी आहे. LIC कडून देशातील सर्व नागरिकांना एकापेक्षा एक योजना ऑफर केल्या जातात. यात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी योजना राबवल्या जातात, या योजनांचा लाभ देशातील सर्व स्तरातील लोकांना मिळत आहे.
अशा परिस्थितीत LIC ने महिलांसाठी एक खास योजना आणली आहे. या योजनेत महिलांना मॅच्युरिटीवर बक्कळ पैसा मिळत आहे. जर तुम्ही एलआयसीची कोणतीही पॉलिसी पाहत असाल तर ती तुमच्यासाठी खास ठरू शकते.
आजच्या या लेखात आपण अशाच एका उत्तम योजनेबद्दल बोलत आहोत ज्याचे नाव आहे LIC आधार शिला योजना असे आहे. एलआयसीच्या या योजनेत महिलांना मोठा परतावा मिळतो. तसेच अनेक लाभ देखील मिळत आहेत.
LIC आधार शिलायोजना ही एक नॉन-लिंक्ड जीवन विमा योजना आहे. ही योजना खास महिलांसाठी तयार करण्यात आली आहे. या पॉलिसीच्या परिपक्वतेवर, गुंतवणूकदारांना एलआयसीकडून निश्चित रक्कम मिळते. यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी महिलेचे वय 8 ते 55 वर्षे इतके असले पाहिजे.
पॉलिसी पूर्ण होण्यापूर्वी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास, अशा परिस्थितीत कुटुंबाला आर्थिक मदत दिली जाते. या योजनेत केवळ शारीरिकदृष्ट्या निरोगी व्यक्तीच गुंतवणूक करू शकते.
आधार शिला पॉलिसी अंतर्गत, LIC आधार शिला योजनेअंतर्गत मूळ विमा रक्कम किमान 75 हजार आणि कमाल 3 लाख आहे. तुम्हाला या प्लॅनमध्ये प्रीमियम भरण्यासाठी मासिक, त्रैमासिक, सहामाही आणि वार्षिक पर्याय मिळतो.
एलआयसीमध्ये मॅच्युरिटीचे कमाल वय ७० वर्षे आहे. त्याचे उद्दिष्ट हे आहे की, परिपक्वतेच्या वेळी पॉलिसीधारकाचे वय ७० वर्षांपेक्षा जास्त नसावे. या योजनेत मॅच्युरिटीवर एकरकमी पैसे मिळतात.