BH Series Number late : आपल्या कामानिमित्त अनेकदा कायम प्रवास करावा लागतो. दरम्यान, जिथे तुम्हाला 2 किंवा अधिक राज्यांमध्ये प्रवास करावा लागेल किंवा तुम्ही एका ठिकाणी नोकरी करत नसाल आणि तुम्हाला दर दोन-तीन वर्षांनी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जावे लागत असेल तर अश्या वेळी बीएच नोंदणी असलेली नंबर प्लेट तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. जाणून घ्या या नंबर प्लेटचे महत्व.
देशातील संरक्षण कर्मचारी, केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (पीएसयू) यांच्यासाठी बीएच या नंबर प्लेट सुरू करण्यात आल्या असून, यासोबतच खासगी कंपन्यांचे कर्मचारीही ही नंबर प्लेट घेऊ शकतात. त.
भारत नावाची ही नंबर प्लेट ही एक विशेष प्रकारची नोंदणी आहे. वन नेशन, वन रेशन कार्ड सारखी ही वन नेशन, वन नंबर प्लेट आहे. यातील वाहनांच्या नंबर प्लेट 21,22,23 सारख्या क्रमांकाने सुरू होतात. तर यावरून वाहनाची नोंदणी कोणत्या वर्षी झाली हे कळते.
यानंतर, राज्य कोडच्या जागी BH लिहिला जातो. ही संख्या संपूर्ण देशात चालत असून, BH-मालिका नोंदणी चिन्ह YY BH #### XX स्वरूपात आहे. ज्यामध्ये पहिले दोन क्रमांक (YY) नोंदणीच्या वर्षासाठी लिहिलेले आहेत. यानंतर BH भारत सिरीज ही (####) साठी कोड येतो, दरम्यान, ही चार अंकी संख्या आहे. तर याची शेवटची दोन अक्षरे (XX) दोन अक्षरे आहेत. अशा प्रकारे, वाहनांमध्ये बसवलेल्या या नंबर प्लेटवरून बीएच-सिरीजची वाहने ओळखता येतात.
दरम्यान, यासाठी अर्ज हा ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही प्रकारे करता येणार असून,
सर्वप्रथम, या सीरिजसाठी तुम्ही नियम आधी तपासून पहा. यानंतर जर आपली गाडी पात्र असल्यास, अपलोड करावयाच्या कागदपत्रांच्या सॉफ्टकॉपी तयार करा आणि फॉर्म भरा. फॉर्म भरल्यानंतर, शुल्क भरावा आणि RTO ची मान्यता घ्या. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकता.
तर ऑफलाईन अर्ज करण्यासाठी परिवहन विभागाच्या कार्यालयात जाऊन आधीच मिळालेल्या नोंदणी क्रमांकाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे. त्यानंतरच तुम्ही बीएच सीरिजसाठी अर्ज करू शकता. भारत मार्क सिरीजसाठी सर्व कागदपत्रांसह अर्ज करा. पूर्वीचा नोंदणी क्रमांक घेताना तुम्ही भरलेल्या रोड टॅक्सच्या परताव्यासाठी देखील अर्ज करू शकता.