शिर्डी मतदार संघ सरकारी योजनांच्‍या अंमजबजावणीमध्‍ये प्रथम क्रमांकावर

Ahmednagarlive24
Published:

सहकार चळवळीच्‍या माध्‍यमातून समाजातील शेवटच्‍या घटकाला विकासाच्‍या मुख्‍यप्रवाहात आणण्‍याचा संस्‍कार पद्मश्री डॉ.विखे पाटील यांनी दिला. हीच परंपरा जोपासत शिर्डी मतदार संघाने सदैव समाजातील शेवटच्‍या माणसाचे हित जपण्‍याचे काम केले आहे. दिवाळीच्‍या निमित्‍ताने साखर वितरणाचा उपक्रमही सामाजिकतेचा संदेश देणारा ठरला असल्‍याचे प्रतिपादन जेष्‍ठनेते माजी मंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांनी केले.

लोणी बुद्रूक येथे राज्‍य सरकारच्‍या वतीने दिवाळी निमित्‍त देण्‍यात येत असलेल्‍या आनंदाचा शिधा आणि विखे पाटील परिवाराच्‍या वतीने देण्‍यात आलेल्‍या पाच किलो साखरेचे वाटप आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांच्‍या उपस्थितीत करण्‍यात आले.

याप्रसंगी बोलताना आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील म्‍हणाले की, सार्वजनिक जीवनात काम करीत असताना समाजाच्‍या आनंदात आणि दुखात सहभागी होणे खुप महत्‍वाचे असते. या भागाने सदैव समाजासाठी काम करण्‍याचा प्रयत्‍न सुरु ठेवला. पद्मश्री विखे पाटील आणि पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी घालून दिलेला वारसा अशा सामाजिक उपक्रमातून पुढे जात आहे. शिर्डी मतदार संघात त्‍यादृष्‍टीने सुरु असलेले काम खुप महत्‍वपूर्ण असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्‍या माध्‍यमातून विविध सामाजिक योजनांची अंमलबजावणी सुरु केली. या योजनांचे लाभ लाभार्थ्‍यांना होत आहेत. शिर्डी मतदार संघ या योजनांच्‍या अंमजबजावणीमध्‍ये प्रथम क्रमांकावर असून, या मतदार संघाची विकासाची घोडदौड अशा सामाजिक उपक्रमातून वर्षानुवर्षे सुरु राहीली आहे. त्‍यामुळेच मतदार संघाचे वेगळेपण ठळकपणे उठून दिसत असल्‍याचे म्‍हस्‍के पाटील म्‍हणाले .

जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील म्‍हणाल्‍या की, जातपात, धर्म या पलिकडे जावून शिर्डी मतदार संघात माणूसकीच्‍या भावनेतून काम सुरु आहे. शिर्डी मतदार संघातील सर्वच कुटूंबियांना साखरेचे वितरण करुन, दिवाळीच्‍या या शुभेच्‍छा देण्‍याचा प्रयत्‍न आम्‍ही केला असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

याप्रसंगी जिल्‍हा परिषदेच्‍या माजी अध्‍यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील, ट्रक्‍स वाहतुक सोसायटीचे चेअरमन नंदु राठी, सोसायटीचे चेअरमन अशोक धावणे, सरपंच कल्‍पना मैड, किसनराव विखे, एम,वाय विखे, माजी सरपंच लक्ष्‍मण बनसोडे, बाजार समितीचे संचालक राहुल धावणे, विजयराव लगड, माजी उपसरपंच अनिल विखे, तंटामुक्‍ती अध्‍यक्ष संपतराव विखे, माजी सिनेट सदस्‍य अनिल विख, रामभाऊ विखे, एन.डी विखे, प्रविण विखे, सोपान विखे, भाऊसाहेब धावणे, भाऊसाहेब विखे आदिसंह ग्रामस्‍त उपस्थित होते. याच कार्यक्रमात माजीमंत्री आण्‍णासाहेब म्‍हस्‍के पाटील यांचे वाढदिवसाच्‍या निमित्‍ताने ग्रामस्‍थांच्‍या वतीने अभिष्‍ठचिंतन करण्‍यात आले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe