Car Discount News :- सध्या दिवाळी सण मोठा धामधुमीत संपूर्ण भारत वर्षात साजरा केला जात असून सगळीकडे उत्साह व चैतन्याने वातावरण न्हावून निघाले आहे. दिवाळी सणाच्या निमित्ताने अनेक शुभमुहूर्त असतात व
या मुहूर्तावर अनेक गोष्टींची खरेदी करण्याकडे बऱ्याच जणांचा कल असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सणाच्या निमित्ताने अनेक फेस्टिव सीजन सेल देखील आयोजित केलेले असतात व विविध वस्तूंच्या खरेदीवर भरघोस अशा ऑफर्स आणि डिस्काउंट ग्राहकांना देऊ केला जातो.
लक्ष्मीपूजन हा दिवाळी मधील एक महत्त्वाचा दिवस समजला जातो व या दिवशी अनेक वाहनांची खरेदी देखील मोठ्या प्रमाणावर केली जाते. वाहनांमध्ये बाईक्स तसेच कार व ट्रॅक्टर अशी वाहने जास्त प्रमाणात घेतली जातात.
त्यामुळे वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून देखील या कालावधीमध्ये अनेक डिस्काउंट ऑफर ग्राहकांना दिल्या जातात. अगदी याच मुद्द्याला धरून जर आपण पाहिले तर कार घेणाऱ्यांसाठी मारुतीने देखील घसघशीत अशी डिस्काउंट ऑफर वेगवेगळ्या कार मॉडेलवर देऊ केल्या आहेत. त्यामुळे ज्या कोणाला या कालावधीमध्ये कार खरेदी करायची असेल त्यांना निश्चितच मोठा फायदा होणार आहे.
मारुती सुझुकीच्या या कारवर मिळत आहे भरघोस डिस्काउंट
1- मारुती सुझुकी बलेनो- मारुती सुझुकीची बलेनो हे मॉडेल एक चांगली विक्री म्हणजेच बेस्ट सेलिंग मॉडेल असून या कारच्या खरेदीवर मारुती सुझुकी कंपनीकडून ४०००० रुपयांचा डिस्काउंट म्हणजेच सवलत देण्यात येत आहे.
जर आपण यात चाळीस हजार रुपयांचे सवलतीचे स्वरूप पाहिले तर यामध्ये तुम्हाला 20000 रुपयांचा कॅशबॅक, दहा हजार रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि दहा हजार रुपयांची वाढीव सवलत अशा पद्धतीने हे 40000 रुपयाची सवलत तुम्हाला मिळणार आहे.
2- मारुती जिम्नी- मारुती सुझुकी या वाहन निर्मिती कंपनीकडून जे काही कार खरेदीवर सवलत दिली जात आहेत त्यामध्ये जिम्नी या ऑफरोड कारचा देखील समावेश आहे. या कारवर मारुती सुझुकी कडून तब्बल एक लाखांची सूट देण्यात येत आहे.
3- मारुती सुझुकी सियाज- मारुती सुझुकीची ही एक उत्तम कार असून याच्यावर देखील दमदार अशी सवलत दिली जात आहे. साधारणपणे या कारच्या खरेदीवर 38 हजार रुपयांपर्यंत सवलत दिली जात असून या कारची एक्स शोरूम किंमत पाहिली तर ते नऊ लाख तीस हजार रुपये इतकी आहे.
4- मारुती सुझुकी इग्निस- मारुती सुझुकी ही एक फायद्याची डील ठरणार असून या कारवर देखील कंपनीकडून तब्बल सत्तर हजार रुपयांची घसघशीत अशी सूट म्हणजेच डिस्काउंट देण्यात येत आहे. मूळ किंमतीमध्ये ही सूट असल्यामुळे नक्कीच ग्राहकांना याचा खूप मोठा फायदा होणार आहे.
मारुतीच्या या कार मॉडेलवर नसणार कुठलीही सवलत
या मॉडेल व्यतिरिक्त मात्र आपण फ्रॉन्स्क, इन्वीक्टो, एक्सएल 6 आणि ग्रँड विटारा या मॉडेलवर मात्र कुठल्याही प्रकारची सवलत मिळणार नसून ते आहे त्या दरामध्ये विक्रीस उपलब्ध आहेत.