Janata Sahakari Bank : 12 वी ते पदवीधर उमेदवारांना जनता सहकारी बँकेत नोकरीची उत्तम संधी; बघा कुठे सुरु आहे भरती?

Sonali Shelar
Published:
Janata Sahakari Bank

Janata Sahakari Bank : जर तुम्ही सध्या बँकेत नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी कामाची बातमी आहे. जनता सहकारी बँक येवला अंतर्गत सध्या विविध जागांवर भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील नाशिक येथे राहत असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आणि चांगली आहे.

जनता सहकारी बँक येवला अंतर्गत “मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक महाव्यवस्थापक, क्लार्क, कॉन्स्टेबल/वॉचमन” पदांच्या एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. येथे अर्ज अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे. उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

भरती संबंधित अधिक माहिती :-

पदाचे नाव

या भरती अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी, सहायक महाव्यवस्थापक, क्लार्क, कॉन्स्टेबल/वॉचमन पदांच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

पदसंख्या

एकूण 04 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती सुरु आहे.

शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार गरजेची असेल, तरी अर्ज करण्यापूर्वी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

नोकरी ठिकाण

ही भरती येवला जि. नाशिक येथे होत आहे.

अर्ज पद्धती

या भरती साठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

उमेदवारांनी अर्ज मुख्य कार्यकारी अधिकारी, जनता सहकारी बैंक लिमिटेड, येवला ४१८७, बालाजी गल्ली, येवला, ता. येवला, जि. नाशिक- ४२३४०१ येथे पोस्टाने पाठवायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

वरील भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.

असा करा अर्ज

-उमेदवारांनी अर्ज ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
-अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत.
-इतर कोणत्याही मार्गे अर्ज स्वीकारला जाणार नाही.
-अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2023 आहे.
-देय तारखे नंतर आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
-अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी भरती सूचना कळजीपूर्वक वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe