‘त्या’ तरुणाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात न देता नगरमध्येच अंत्यसंस्कार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- मृत्यूपश्चात स्त्रावाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर निघोजमधील संबंधित तरूणाच्या संपर्कात आलेल्या सर्व दहा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.

त्यामुळे निघोज, पिंप्री जलसेन, पठारवाडी, तसेच चिंचोली येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला. मृताच्या १२ वर्षांच्या मुलीच्या अहवालाची प्रतीक्षा होती. तोही शनिवारी सायंकाळी निगेटिव्ह आला.

दरम्यान, निघोज परिसरात मुंबईतील रेड झोनमधून दाखल झालेल्या शेकडो नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येत आहे. ३ मे रोजी पिंपरी जलसेनमध्ये दाखल झालेला निघोजच्या तरूणाचा १२ मे रोजी नगर येथे उपचारासाठी नेताना मृत्यू झाला.

त्य पॉझिटिव्ह अहवाल आल्याने तरूणाची पत्नी, दोन मुले, आई, वडील, सासू, सासरे, मेहुणा व त्याचा साथीदार, मेहुणी आदींचे स्त्राव चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. सर्व अहवाल निगेटिव्ह आल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

तरूणाचा मृतदेह कोरोना अहवाल येईपर्यंत जिल्हा रूग्णालयातच ठेवण्यात आला होता. अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात न देता प्रशासनाने त्याच्यावर नगरच्या अमरधाममध्ये अंत्यसंस्कार केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment