Rooftop Solar Yojana: योजनेतून अनुदान मिळवा आणि छतावर सोलर पॅनल बसवा! विजबिलापासून आयुष्यभरासाठी मिळेल मुक्तता

Published on -

Rooftop Solar Yojana:- रूफटॉफ सोलर योजना ही महाराष्ट्र सरकारची एक महत्वपूर्ण योजना असून या योजनेच्या माध्यमातून सौर ऊर्जा वापरायला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने घरगुती तसेच व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना घराच्या छतावर सौर पॅनल बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. तसे पाहायला गेले तर केंद्र सरकारच्या माध्यमातून देखील सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून आणि शेतीसाठी महत्वाच्या असलेल्या सौर पंपाकरिता पीएम कुसुम सोलर योजना राबवली जात आहे. या सगळ्या योजनांच्या माध्यमातून संबंधित लाभार्थ्यांना अनुदान दिले जाते. याच अनुषंगाने सौर रूप-टॉप सोलर योजना खूप महत्त्वाची योजना असून घरगुती ग्राहकांसाठी ही खूप फायद्याची योजना आहे.

 काय आहेत या योजनेचे फायदे?

घरगुती ग्राहकांना त्यांच्या महिन्याचे जे काही विज बिल येते त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर बचत होण्यास मदत होईल. घरगुती ग्राहकांव्यतिरिक्त व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना देखील विजेच्या खर्चामध्ये बचत होण्यास मदत होईल. तसेच राज्य सरकारला हरित ऊर्जा निर्मिती करिता प्रोत्साहन मिळेल. तसेच सौर पॅनलच्या माध्यमातून पर्यावरणाचे प्रदूषण तर कमी होईलच परंतु रोजगार निर्मितीसाठी देखील हातभार लागेल.

 या योजनेअंतर्गत किती मिळते अनुदान?

या योजनेअंतर्गत अनुदानाची रक्कम हे सौर पॅनल किती वॅट क्षमतेचे आहे व ग्राहकाची श्रेणी नेमकी काय आहे यावर निश्चित केले जाते. साधारणपणे घरगुती ग्राहकांकरिता 40% किंवा प्रति किलोवॅट 14500 अनुदान दिले जाते तर व्यावसायिक आणि औद्योगिक ग्राहकांना 20% अनुदान मिळते.

 या योजनेसाठीची आवश्यक पात्रता

या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार हा महाराष्ट्र राज्यातील रहिवासी असणे गरजेचे असून संबंधित ग्राहकाचे किंवा अर्जदाराचे घराचे छत हे सौर पॅनल बसवण्याकरिता योग्य असावे. तसेच ग्राहकाने महावितरण कडून वीज पुरवठा घेतला पाहिजे या काही महत्त्वाच्या अटी आहे.

 या योजनेसाठीचे अर्ज प्रक्रिया आणि अर्जाची स्विकृती

या योजनेकरिता अर्ज करण्याकरिता ग्राहकांना महावितरणाच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागतो. अर्ज करण्यासाठी ग्राहकांना आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे आवश्यक असते व यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड तसेच रेशन कार्ड, मालमत्ता कर पावती आणि छताचा नकाशा आवश्यक असतो. यामध्ये तुम्ही अर्ज केल्यानंतर महावितरणच्या अधिकाऱ्याकडून ग्राहकांचा अर्ज तपासला जातो व ग्राहकांना अनुदान मंजूर त्यांच्या माध्यमातून केले जाते.

जेव्हा अनुदान मंजूर होते तेव्हा ग्राहक सौर पॅनल बसवण्यासाठी पुरवठा दाराशी संपर्क साधू शकतो. यामध्ये सोलर पॅनल द्वारे जी काही वीज उत्पादित होते ते ग्राहक स्वतः वापरू शकतो किंवा महावितरणला विकू शकतो. यामध्ये नेट मीटरिंग ही एक प्रणाली असून या माध्यमातून ग्राहकांना त्यांचे वीज बिल कमी करण्याकरिता महावितरण ला जास्तीची वीज विकण्याची परवानगी दिली जाते.

 या योजनेअंतर्गत किती अनुदान मिळते?

1- घरगुती ग्राहकांसाठी एक ते तीन किलो वॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या उपकरणाकरिता 40% अनुदान दिले जाते.

2- तीन किलो वॅट व त्यापेक्षा अधिक दहा किलो वॅट पर्यंत विद्युत निर्मिती उपकरणांकरिता 20 टक्के अनुदान दिले जाते.

3- गृहनिर्माण रहिवासी संस्था व निवासी कल्याणकारी संघटनेमध्ये जे काही ग्राहक राहतात त्यांना प्रत्येक घरासाठी दहा किलो वॅट विद्युत निर्मिती करणाऱ्या सौर उपकरणांवर  20% अनुदान मिळते.

 या योजनेसाठी अर्ज करण्याची अधिकृत वेबसाईट

या योजनेकरिता अर्ज करायचा असेल तर त्याकरिता शासनाची अधिकृत वेबसाईट असून ती म्हणजे https://solarrooftop.gov.in/ असून यावर अर्ज करता येऊ शकतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe