Fixed Deposit : फक्त एका वर्षातच व्हा मालामाल; ‘या’ बँका एका वर्षाच्या FD वर देत आहेत सर्वाधिक व्याज !

Fixed Deposit : सध्या एफीवरील व्याजदरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. म्हणूनच ग्राहक देखील येथे गुंतवणूक करण्यास प्रथम प्राधान्य देत आहे. सुरक्षितेसह उत्तम परतावा मिळत असल्यामुळे बरेचजण येथे गुंतवणूक करत आहेत, एफडी सुरु करण्याची सुविधा बँक तसेच पोस्ट देत आहे.

रिझर्व्ह बँकेने मे 2022 पासून रेपो रेट वाढवण्यास सुरुवात केल्यापासून, FD वरील व्याजदर देखील बँकांकडून वेगाने वाढवले ​​जात आहेत. FD व्याजदरात गेल्या दोन वर्षात सर्वात वेगाने वाढ दिसून आली. अशातच तुम्हीही सध्या एफडी करण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही अशा बँकांबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्हाला सर्वाधिक व्याजदर ऑफर करत आहेत.

टॉप बँक एफडी व्याजदर

FD च्या काही कालावधीवर, बँका 9% पेक्षा जास्त व्याज देत आहेत. तर काही बँका एका वर्षाच्या एफडीवर ७ ते ८ टक्के आणि त्याहून अधिक व्याज देत आहेत. या बँकांमध्ये सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही बँकांचा समावेश आहे-

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक

उज्जीवन स्मॉल फायनान्स बँक एका वर्षाच्या एफडीवर ८.२५ टक्के दराने व्याज देत आहे. कोणत्याही बँकेने दिलेला हा सर्वाधिक व्याजदर आहे.

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक

इक्विटास स्मॉल फायनान्स बँक एका वर्षाच्या मुदत ठेवींवर ८.२ टक्के व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांना बँकेकडून जास्त व्याजदर देण्यात येत आहेत.

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक

उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक आणि जना स्मॉल फायनान्स बँक देखील ग्राहकांना वार्षिक ८ टक्के दराने व्याज देत आहेत. हे व्याज एका वर्षाच्या एफडीच्या कालावधीवर दिले जात आहे.

इंडसइंड बँक आणि कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक

इंडसइंड बँक आणि कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक देखील ग्राहकांना 7.5% व्याज दर देत आहेत. दोन्ही बँकांकडून ही ऑफर एक वर्षाच्या व्याजदरावर आहे.

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक

फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक एका वर्षाच्या एफडीवर ७.६५ टक्के दराने व्याज देत आहे. ज्येष्ठ नागरिकांनी एफडी केल्यास त्यांना अधिक व्याज दिले जाईल.