Health Tips: सकाळी प्या ‘हा’ चहा आणि मुक्तता मिळवा केस गळणे आणि अपचन यासारख्या समस्यांपासून! होईल फायदा

Ajay Patil
Published:
healthy drink

Health Tips:- बऱ्याच जणांना आरोग्यविषयक छोट्या-मोठ्या समस्या उद्भवतात. जरी अशा समस्या बऱ्याचदा शरीराला त्रासदायक नसल्या तरी देखील त्या शरीराच्या दृष्टिकोनातून फायदेशीर नक्कीच नसतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीरावर ऋतूनुसार देखील वेगवेगळ्या प्रकारचे परिणाम होत असतात.

प्रत्येक ऋतूमध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्य विषयक समस्या उद्भवतात. त्यामुळे आपण अशा छोट्या-मोठ्या आरोग्य विषयक समस्यांच्या बाबतीत जागरूक राहून उपाययोजना करणे खूप गरजेचे असते. उदाहरणच घ्यायचे झाले तर सध्या हिवाळा सुरू झाला असून यावेळी गुलाबी थंडी सगळीकडे असते व या थंड वातावरणामध्ये सर्दी, केस गळण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर डोके वर काढायला लागतात.

तसेच या कालावधीमध्ये भूक देखील जास्त प्रमाणात लागत असल्यामुळे जेवणाचे प्रमाण वाढते व पोट फुगणे तसेच ऍसिडिटीची समस्या देखील उद्भवते. या व इतर समस्या देखील या ऋतूमध्ये उद्भवू शकतात. त्यामुळे हिवाळ्यामध्ये या समस्या उद्भवूच नये म्हणून काय करता येईल? असा विचार जर तुम्ही करत असाल तर तुम्हाला फक्त सकाळी हे आरोग्यदायी पेय घ्यावे लागेल. जर तुम्ही दररोज दिवसाची सुरुवात जर या एका पेयाने केली तरी तुमच्या बऱ्याच समस्या दूर होण्यास खूप मोठी मदत होईल.

 सकाळी प्या हे आरोग्यदायी पेय

हे पेय तयार करण्यासाठी तुम्हाला काही साहित्याची आवश्यकता असते व ते साहित्य म्हणजे तुम्हाला दोन ग्लास पाणी, सात ते दहा कढीपत्त्याची पाने, तीन सेलेरीची पाने, एक चमचा धने तसेच एक चमचा जिरे, ठेचलेली एक वेलची आणि किसलेले एक इंच आकाराचे आले इत्यादी साहित्य तुम्हाला लागते.

 कशा पद्धतीने बनवाल हे आरोग्यदायी पेय?

हे पेय बनवण्यासाठी अगोदर एका पातेल्यामध्ये पाणी गरम करून घ्यावे व त्या पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता, धने तसेच जिरे, वेलची आणि किसलेले आले टाकून घ्यावे. हे मिश्रण पाच मिनिटे चांगले उकळावे व नंतर थोडे थोडे त्याला गाळून ते प्यावे.

 या पेयामध्ये वापरलेल्या साहित्याचा आरोग्याला कसा होतो फायदा?

1- सेलेरी पानांचा फायदा हे पाने अपचन तसेच सर्दी, मधुमेह, अस्थमा तसेच सूज येणे  व वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असे घटक असतात.

2- कढीपत्त्याचा फायदा वजन नियंत्रित करण्याकरिता तसेच रक्तातील साखरेचे पातळी कमी करण्यासाठी, हिमोग्लोबिनची पातळी सुधारण्यास व केस गळणे कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.

3- जिऱ्याचा फायदा साखर तसेच वजन कमी होण्यासाठी, आम्लपित्त, मायग्रेन आणि कोलेस्ट्रॉल पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी हे फायदेशीर ठरते.

4- आल्याचा फायदा आले हे अपचन तसेच गॅस, वजन कमी होणे यासारख्या अनेक समस्या दूर करण्यासाठी मदत करते.

5- वेलचीचे फायदे मळमळ तसेच मायग्रेन, उच्च रक्तदाब तसेच केस व त्वचेसाठी वेलची हे खूप फायदेशीर आहे.

सकाळी जर तुम्ही दिवसाची सुरुवात या पेयाने केली तर नक्कीच तुमची सुरुवात ही आरोग्यदायी आणि उत्साहाने भरलेली राहील हे मात्र निश्चित.

( आहारामध्ये कुठलाही बदल करण्याआधी किंवा आरोग्यासाठी कुठलेही सेवन करण्याआधी वैद्यकीय तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe