Aadhaar Card Loan: त्वरित पैशांची आवश्यकता आहे का? तुमच्या आधार कार्डद्वारे मिळू शकते तुम्हाला ताबडतोब कर्ज! वाचा संपूर्ण प्रोसेस

Published on -

Aadhaar Card Loan:- बऱ्याचदा आपल्याला काही कारणासाठी त्वरित पैशांची गरज भासते व अशाप्रसंगी आपल्याकडे बऱ्याचदा पैसा नसतो. त्यामुळे आपण मित्र किंवा नातेवाईकांचा आधार घेतो. बऱ्याचदा आपण बँकांच्या माध्यमातून देखील कर्ज मिळवण्यासाठी प्रयत्न करतात.

परंतु यामध्ये जर आपण पाहिले तर तुमचे आधार कार्डचा वापर करून तुम्ही कर्ज घेऊ शकता व ही प्रक्रिया खूप सोपी आहे. आधार कार्डच्या माध्यमातून कर्ज घेण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असून त्या माध्यमातून तुम्ही कर्जासाठी अर्ज करू शकतात. जर आपण पाहिले तर स्टेट बँक ऑफ इंडिया तसेच बँक ऑफ बडोदा सारख्या इतर बँका आधार कार्डच्या माध्यमातून तुम्हाला एक लाख रुपये पर्यंतचे कर्ज देखील सहजतेने देऊ शकतात.

बँकांनी सध्या पर्सनल लोन घेण्याची प्रक्रिया अत्यंत सुलभ केली असून त्यामुळे तुम्ही काही कागदपत्र दिल्यानंतर तुम्हाला सहजपणे पर्सनल दोन मिळू शकते. एवढेच नाही तर तुम्ही घरबसल्या देखील पर्सनल लोनसाठी अर्ज करू शकतात. आधार कार्डचा वापर करून तुम्ही पर्सनल लोन साठी अर्ज करू शकता व बँकांच्या माध्यमातून केवायसी नंतर तुमचे कर्ज मंजूर केले जाते. साहजिकच याकरिता तुमचा सिबिल स्कोर चांगला असणे गरजेचे आहे. नेमके तुम्हाला आधार कार्डच्या आधारावर कर्ज कसे दिले जाते याची संपूर्ण माहिती आपण घेऊ.

 आधार कार्ड द्वारे कर्ज घेण्यासाठी करू शकता अर्ज

जर आपण बँकांचा विचार केला तर बऱ्याच बँका आधार कार्डच्या माध्यमातून पर्सनल लोन मंजूर करतात. यामध्ये उदाहरण घ्यायचे झाले तर कोटक महिंद्रा बँक तसेच एचडीएफसी व स्टेट बँक ऑफ इंडिया यासारख्या बँकांचा समावेश करता येईल. यामाध्यमातून तुम्ही आधार कार्डचा वापर करून सहजतेने पर्सनल लोन मिळवू शकतात.

 आधार कार्ड द्वारे कर्ज घेण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा

1- तुम्हाला ज्या बँकेकडून कर्ज घ्यायचे आधी त्या बँकेची निवड करा व त्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जा. वेबसाईट ऐवजी तुम्ही बँकेच्या एप्लीकेशनचा देखील वापर या माध्यमातून करू शकतात. वेबसाईट किंवा एप्लीकेशन वर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर आणि ओटीपी च्या माध्यमातून लॉगिन करा.

2- लॉगिन केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला पर्सनल लोन हा पर्याय दिसेल तो पर्याय निवडावा. यासाठी तुम्ही कर्ज घेण्यासाठी पात्र आहात की नाही हे तपासू शकता व त्यानंतर रक्कम तपासून पुढे जा.

3- त्यानंतर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती विचारली जाते जसे की तुमचे नाव, तुमची जन्मतारीख, घराचा पत्ता, ऑफिसचा पत्ता इत्यादी माहिती तुम्हाला द्यावी लागते. त्यानंतर विचारलेली कागदपत्रे अपलोड करावी लागतात व केवायसी प्रक्रिया अशा पद्धतीने पूर्ण होते.

4- केवायसी झाल्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकावा लागतो व त्यानंतर तुमचे कर्ज मंजूर होते व ते मंजूर झाल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये ती रक्कम जमा होते.

5- यामध्ये लक्षात ठेवण्याची बाब म्हणजे कर्जासाठी आधार कार्ड सोबत तुम्हाला इतर काही कागदपत्रे देखील लागण्याची शक्यता असते. यामध्ये प्रत्येक बँकेची प्रक्रिया वेगवेगळी असते. अशा प्रकारच्या कर्जामध्ये तुमचा सिबिल स्कोर सगळ्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. त्यामुळे अशा पद्धतीच्या कर्जासाठी तुम्ही बँकेच्या शाखेत जाऊन अशा पद्धतीने पर्सनल लोन घेणे विषयीची सविस्तर माहिती घेऊ शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe