Sarkari Yojana: मुलींना शासन देणार आता 1 लाख 1 हजार रुपये! शिक्षणात प्रगती करण्यासाठी मुलींना होणार मदत

Ajay Patil
Published:

Sarkari Yojana:- महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली लेक लाडकी योजना ही मुलींसाठी एक महत्वपूर्ण योजना असून या अंतर्गत गरीब व आर्थिक दृष्ट्या मागास कुटुंबातील मुलींना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून एक लाख एक हजार रुपयांचे आर्थिक मदत दिली जाणार आहे.

लेक लाडकी योजना ही महाराष्ट्रातील सर्व गरीब मुलींसाठी खूप फायद्याची व वरदानदायी ठरणार आहे. राज्याच्या अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2023-24 चा अर्थसंकल्पामध्ये ही योजना जाहीर केली होती. या योजनेच्या अंतर्गत गरीब पात्र मुलींना वयाची 18 वर्षे पूर्ण करेल तेव्हा तिला 75 हजार रुपयांची रोख रक्कम दिली जाणार आहे. या अनुषंगाने या लेखांमध्ये लेक लाडकी योजनेविषयीची महत्त्वाची माहिती आपण जाणून घेणार आहोत.

शासन मुलींना देणार एक लाख एक हजार रुपये

मुलींचा जन्मदर वाढवणे व शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे याकरिता आर्थिक मदत मिळावी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून माझी कन्या भाग्यश्री या योजनेत सुधारणा करून नवीन लेक लाडकी योजना सुरू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून पिवळे किंवा केशरी शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना एक एप्रिल 2023 किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना प्रत्येकी एक लाख एक हजार रुपये दिले जाणार असून कुटुंबामध्ये जर एक मुलगा व एक मुलगी असेल तर मुलीला या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.

या योजनेच्या माध्यमातून पिवळ्या व केशरी रेशन कार्डधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर टप्प्याटप्प्याने अनुदान देण्यात येणार असून जी मुलगी या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी आहे त्या मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये रोख देण्यात येणार आहेत.

जर आपण या योजनेच्या माध्यमातून मुलीला मिळणाऱ्या आर्थिक लाभाचे स्वरूप पाहिले तर मुलीचा जन्म झाल्यानंतर पाच हजार रुपये, जेव्हा मुलगी पहिली मध्ये जाईल तेव्हा 6000 रुपये, सहावीत मुलगी गेल्यानंतर सात हजार रुपये, मुलगी अकरावीत गेल्यावर आठ हजार रुपये तर मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये दिले जाणार आहे. म्हणजेच एकूण मुलीला एक लाख एक हजार रुपये आर्थिक लाभ मिळणार आहे.

 लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

1- याकरिता लाभार्थी मुलीचा जन्माचा दाखला, कुटुंबप्रमुखाचा एक लाख रुपये किंवा कमी उत्पन्न असल्याचा तहसीलदार यांचा दाखला

2- लाभार्थी मुलीच्या पालकांचे आधार कार्ड, बँकेच्या पासबुकची पहिल्या पानाची छायांकित प्रत, पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड छायांकित प्रत

3- मतदान ओळखपत्र( मुलगी जेव्हा शेवटचा लाभाकरिता म्हणजेच अठरा वर्षे पूर्ण होईल तेव्हा तिचे मतदार यादीत नाव आवश्यक)

4- तसेच या टप्प्यावर मुलगी शिक्षण घेत असल्याचा संबंधित शाळेचा दाखला

5- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र

या योजनेच्या लाभ घेण्यासाठी महत्त्वाच्या अटी

ही योजना प्रामुख्याने एक एप्रिल 2023 रोजी वा त्यानंतर जन्माला येणाऱ्या पिवळे व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दोन मुलींना लागू राहणार असून यामध्ये एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहिला. पहिल्या हपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करताना माता किंवा पित्याने कुटुंबनियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहणार असून सदर कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe