आमदार संग्राम जगताप करणार उपोषण ! हे आहे महत्वाचं कारण

Ahmednagarlive24 office
Updated:
Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर शहरातील मुख्य बाजारपेठेत चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याने व्यापारी वर्ग भयभीत झाला आहे, पोलीस तपासही वेळेवर होत नसल्याने चोरट्यांचे धाडस वाढत आहे,

यातून बाजारपेठेत सातत्याने चोरीच्या घटना घडत आहे, या प्रकाराकडे पोलीस प्रशासनाने तातडीने लक्ष घालून तपासाला गती द्यावी अन्यथा २८ नोव्हेंबरपासून दाळमंडईत उपोषण करू असा इशारा आ. संग्राम जगताप यांनी दिला.

अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र चोपडा, कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, तोफखान्याचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, अजिंक्य बोरकर, सचिन जगताप आदींसह व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते,

आडते बाजार, दाळमंडई, एम.जी. रोड व त्या लगतचा सर्व परिसर या भागात दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढत चालले असून, पोलीस प्रशासनातर्फे कोणत्याही प्रकारचे उपाययोजना किंवा चोऱ्या कशा रोखता येतील याबाबत कोणतीही ठोस कारवाई होताना दिसत नसून ज्या चोऱ्या झाल्या आहेत.

त्याबाबतीत ही आजपावेतो योग्य असा तपास होऊन आरोपी अटक झालेले नाहीत. ११ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रताप हर्दवाणी यांना मारहाण करून त्यांच्याकडील पैश्याची बॅग हिसकावून घेऊन काही चोरटे पळून गेले होते. त्याबाबत त्यांनी तोफखाना पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून,

तसाच काहीसा प्रकार हा दिपक आहुजा यांच्या बाबतीत डाळमंडई परिसरात घडला होता. त्यात ही त्यांना मारहाण करुन त्यांच्या ही पैश्याची बॅग हिसकावून चोरली होती. अशा चोरीच्या घटना सध्या बाजारपेठ परिसरात घडत आहेत.

आज पर्यंत सदर चोरीचा उलगडा पोलीस प्रशासनाकडून झालेला नसून सदरचे आरोपी हे आजही मोकाट फिरत आहेत, असा आरोप करण्यात आला. सदरच्या चोऱ्यांच्या प्रकारातून एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही

काही महिन्यापूर्वी अहमदनगर शहरालगतच चोरीच्या घटनेतूनच खूनासारखी गंभीर घटना घडली होती. अशी एखादी घटना घडण्याची वेळ पुन्हा येऊ नये याकरिता पोलीस प्रशासनाकडून काही तरी ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe