मुंबईवरून पुणे गाठता येईल फक्त 90 मिनिटात! लवकरच समुद्रावरील ‘हा’ पूल होणार वाहतुकीसाठी खुला, कसा राहील पुणे जाण्याचा मार्ग?

Ajay Patil
Published:
mumbai trans harbour link road

मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी व महाराष्ट्राची राजधानी असून देशातील एक महत्त्वपूर्ण शहर आहे तसेच देशाचे आर्थिक केंद्र म्हणून देखील ओळखले जाते. त्यामुळे साहजिकच भारतीय लोकसंख्या व औद्योगीकरणाच्या दृष्टिकोनातून मुंबईमध्ये रस्ते, रेल्वे तसेच मेट्रो सारख्या पायाभूत सुविधांची उभारणी खूप महत्त्वाची आहे व त्या दृष्टिकोनातून  मुंबई शहरामध्ये अनेक प्रकारचे उड्डाणपूल तसेच रस्ते प्रकल्प व मेट्रो प्रकल्पांचे काम मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आलेले आहेत.

मुंबई मध्ये असलेले इतर उपनगरांची कनेक्टीव्हिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून देखील या रस्ते प्रकल्प व मेट्रो प्रकल्पांचे जाळे महत्त्वाचे आहेच परंतु मुंबईवरून इतर शहर जसे की पुण्यासारख्या  शहरादरम्यानच्या प्रवासासाठी देखील मुंबईतील काही प्रकल्प खूप महत्त्वाचे ठरणार आहे.

या दोन्ही शहरांच्या दृष्टिकोनातून जर आपण मुंबईतील मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अर्थात एमटीएचएल या समुद्रपुलाचा विचार केला तर हा आता पुढच्या महिन्यांमध्ये नागरिकांसाठी वाहतुकीस खुला होण्याची दाट शक्यता असून डिसेंबर महिन्यामध्ये हा पुल वाहतुकीसाठी सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून संबंधित प्रशासनाच्या माध्यमातून देखील तयारी वेगात सुरू आहे. या पुलाचे महत्त्व नेमके मुंबईच्या दृष्टिकोनातून काय आहे ते आपण या लेखात बघू.

 मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे मुंबईच्या दृष्टिकोनातून महत्व

मुंबईमध्ये वाहतुकीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा  असा मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पुढच्या महिन्यांमध्ये वाहतुकीस खुला होण्याची शक्यता असून डिसेंबर महिन्यामध्ये हा पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात येईल अशी एक शक्यता आहे. जेव्हा हा पूल वाहतुकीसाठी सुरू होईल तेव्हा मुंबई ते नवी मुंबई या दोन शहरांमध्ये अंतर कमी होईलच परंतु पुणे आणि मुंबईच्या प्रवाशाच्या दृष्टिकोनातून देखील खूप महत्त्वाचा असा हा मार्ग आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा एक समुद्रावरील पूल असून त्याची लांबी 22 किलोमीटर इतकी आहे. 98% पर्यंत या पुलाचे काम पूर्ण करण्यात आलेले असून एकूण असलेल्या 22 किलोमीटर लांबी पैकी 16 किलोमीटर लांबीचा भाग हा समुद्रावर बांधण्यात आलेला आहे. साधारणपणे 25 डिसेंबर रोजी हा पूल प्रवाशांसाठी वाहतुकीस खुला होईल अशी शक्यता आहे.

तसेच हा पूल सुरू झाल्यानंतर मुंबई वरून नवी मुंबईला पोहोचणे खूप सुलभ होणार आहे. हा पूल वाहतुकीला जेव्हा सुरू होईल त्यानंतर मध्य मुंबईत असलेल्या सेवरी ते नवी मुंबईतील चिरले या दरम्यानचा प्रवास अवघा वीस मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे.

पुणे व लोणावळा खंडाळा ते मुंबई हा प्रवास 90 मिनिटात पूर्ण होण्याची देखील शक्यता आहे. या पुलासाठी 18000 कोटीचा खर्च करण्यात आला असून हा देशातील सर्वात लांब समुद्री पूल असून मुंबई ट्रांस हार्बर लिंक १६.५ किलोमीटर लांब डेक असलेला हा भारतातील पहिला पूल आहे.

 भविष्यात पुण्याला जाण्याचा मार्ग असा असणार

सध्या पुण्याला जाण्याचा मार्ग जर पाहिला तर पी.डी. मेलो रोडवरून फ्रीवे व त्यानंतर सायन पनवेल द्रुतगती मार्ग या माध्यमातून तुम्ही मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर सध्या प्रवास करतात. परंतु भविष्यामध्ये पि.डी.मेलो रोडवरून फ्रीवे( शिवडीच्या पुढे बाहेर पडाव लागणार) व त्यानंतर तुम्ही मुंबई ट्रान्स हार्बर लिंक वरून पुढे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर चिरले मार्गाने प्रवास करू शकणार आहात. तसेच हा मार्ग पुढे गोव्यापर्यंत जाणार आहे. त्यामुळे आता यादरम्यानच्या प्रवासामध्ये तब्बल 90 मिनिटांचा वेळ वाचण्यास मदत होणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe