BSNL Recharge Plans : BSNL ग्राहकांमध्ये स्वस्त प्लॅनसाठी ओळखले जाते. सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL कडे अनेक परवडणाऱ्या रिचार्ज योजना आहेत. ज्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी पुरेशा आहेत. BSNL अगदी ५० रुपयांपासून रिचार्ज प्लॅन ऑफर करते. दरम्यान आज आपण BSNL च्या अशाच एका प्लॅन बद्दल जाणून घेणार आहोत.
आज आम्ही तुम्हाला बीएसएनएलच्या 82 दिवसांच्या प्लॅनबद्दल सांगणार आहोत ज्याचा एक दिवसाचा खर्च फक्त 6 रुपये आहे. तुम्ही सध्या बीएसएनएलचा 3 महिन्यांचा प्लॅन शोधत असाल तर तुम्ही 485 रुपयांचा प्लान घेऊ शकता. सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) चा हा प्लान दररोज 1.5GB डेटा देतो. तसेच अनेक फायदे देखील देतो, चला त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
485 रुपयांच्या प्लॅनमध्ये 82 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. एकदा रिचार्ज केल्यानंतर, तुम्हाला 3 महिन्यांपर्यंत रिचार्जचे टेन्शन राहणार नाही. बीएसएनएलच्या या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी डेटा मिळतो. ग्राहकांना यात अमर्यादित व्हॉइस कॉल्स आणि दररोज 100 एसएमएस मिळतात. तसेच यामध्ये ग्राहकांना लोकल आणि एसटीडी कॉलचाही फायदा मिळतो.
जर आपण या प्लॅन्सच्या दैनंदिन खर्चाबद्दल बोललो तर ते जवळपास 6 रुपये आहे. जर आपण एका महिन्याच्या खर्चाबद्दल बोललो तर तो 162 रुपये येतो. या प्रीपेड प्लानमध्ये युजरला एकूण 123GB डेटा मिळतो. अधिक डेटा वापरणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लॅन उपयुक्त ठरणार आहे. अधिक माहितीसाठी, तुम्ही कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. याशिवाय, बीएसएनएलचा 599 रुपयांचा प्लॅन देखील आहे जो 84 दिवसांच्या वैधतेसह येतो.