Booking Coach in Train : लांबचा प्रवास असो किंवा लग्न समारंभ असो, सामान्य माणसाची पहिली पसंती म्हणजे रेल्वे. कारण रेल्वेचा प्रवास हा विमानाच्या मानाने खूप स्वस्त आहे. सध्या देशात सणांचा हंगाम संपला असून काही दिवसांनी लग्नसराई सुरू होणार आहे. या मोसमात मोठ्या प्रमाणात लोक एक शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यासाठी रेल्वेचा वापर करतात.
दरम्यान, बरेचजण लग्नाची वरात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात घेऊन जातात. अशा परिस्थितीत लोकं ट्रेनचा डबा बुक करतात. जेणेकरून पूर्ण परिवार अगदी आरामात एकत्र प्रवास करू शकेल. अशातच आम्ही तुम्ही ट्रेनचा डबा कसा बुक करायचा याबद्दल माहिती देणार आहोत.
तुमच्या माहितीसाठी भारतीय रेल्वेने संपूर्ण डबा बुक करण्यासाठी काही विशेष नियम केले आहेत. तुम्ही IRCTC शी संपर्क करून संपूर्ण ट्रेनचे डबे बुक करू शकता.
पूर्ण कोच कसा बुक करायचा?
तुम्हालाही ट्रेनचा डबा बुक करायचा असेल तर, तुम्हाला सामान्य तिकिटाच्या तुलनेत 30-40 टक्के भाडे जास्त द्यावे लागेल. याशिवाय तुम्हाला सुरक्षा शुल्क देखील जमा करावे लागेल. हे सुरक्षा शुल्क तुम्हाला परत केले जाते. कोच बुकिंगसाठी तुम्हाला IRCT च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.
यानंतर तुम्हाला FTR सर्व्हिसवर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्हाला तुमच्या IRCTC खात्यात लॉग इन करावे लागेल. आता येथे सर्व माहिती प्रविष्ट करा आणि कोच बुकिंगचे शुल्क भरा. तुम्हाला 50,000 रुपये शुल्क भरावे लागेल.
जर तुम्ही संपूर्ण ट्रेन बुक केली तर तुम्हाला 18 डब्यांसाठी तुम्हाला 9 लाख रुपये मोजावे लागतील. याशिवाय तुम्हाला हॉल्टिंग चार्ज भरावा लागेल. यासाठी तुम्हाला 10,000 रुपये शुल्क द्यावे लागेल.
81 कोच बुक करण्यासोबतच तुम्हाला 3 SLR डबे देखील जोडावे लागतील. या कोचसाठीही तुम्हाला शुल्क भरावे लागेल. तुम्हाला 2 महिने अगोदर कोच बुक करावा लागेल. आपण कोणत्याही कारणास्तव केच बुकिंग रद्द केल्यास, आपल्याला यासाठी शुल्क देखील द्यावे लागेल. ट्रेन सुटण्याच्या २ दिवस आधी तुम्ही बुकिंग रद्द करू शकता.