पाटाच्या पाण्यात बुडून तरुणाचा मृत्यू

Published on -

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- मुळा पाटचारीचे पाण्यात मित्रांसमवेत पोहण्यास गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला.

पाथर्डी तालुक्यातील पाडळी गावच्या शिवारात शनिवारी ही घटना घडली. राजेंद्र बाबुराव साळवे (वय ३८) असे मृताचे नाव आहे.

पोहोताना पाण्याचा अंदाज न आल्याने राजेंद्र बुडाले.

पोलिसांनी ग्रामस्थांच्या समवेत रात्री उशिरापर्यंत मृतदेह शोधण्यासाठी प्रयत्न केले.

पाण्याचा प्रवाह ओसरण्यासाठी हनुमान टाकळी म्हसोबा लवण भागातील

मुळा पाटचारीच्या उपवीतरीकांकडे पाटचारी आवर्तनाचे पाणी पाटबंधारे कर्मचा-यांनी वळविले.

त्यानंतर येडोबा मंदिराजवळ साळवे यांचा मृतदेह रविवारी सकाळी सापडला.

याबाबत पोलिसात आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe