अहमदनगर :- माजी खा. दिलीप गांधी यांची खासदारकी गेली, आता त्यांच्याकडे भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष पद आहे. तेही काढून घेण्याचे घाटत आहे. त्यानंतर अर्बन बँकेत पानीपत करण्याची तयारी गांधी विरोधकांनी चालवली आहे.
नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक डिसेंबरमध्ये होणार आहे. नगरमधील वैभवशाली आणि 109 वर्षाचा वारसा असलेल्या या बँकेचे नेतृत्व माजी खासदार दिलीप गांधी यांच्याकडे असून त्यांच्या ताब्यातून बँक खेचून आणण्याकरीता गांधी विरोधक सरसावले आहेत.

अर्बन बँक निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात होण्यापूर्वीच ‘बँक बचाव कृती समिती’च्या नावाखाली विरोधक एकवटत असल्याचे चित्र आहे. माजी संचालक राजेंद्र गांधी, वसंत लोढा हे गांधी विरोधात वातावरण गरम करत आहेत.
2014 मधील निवडणुकीत 18 संचालक असलेल्या बँकेची धुरा सभासदांनी एकतर्फी दिलीप गांधी यांच्या हातात सोपविली. विरोधी पॅनलचा सुपडा साफ करत गांधी पॅनलचे सगळे संचालक विजयी झाले.
त्यामुळे गांधी यांना विरोध करणार एकही संचालक बॉडीत नाही. गतवेळी अॅड. अभय आगरकर आणि अॅड. अशोक कोठारी यांनी गांधी विरोधी पॅनलची जुळवाजुळव करत नेतृत्व केले होते.
- New GST Slab: GST मध्ये करण्यात आले मोठे बदल! त्यामुळे मोबाईल होणार का स्वस्त? वाचा सत्य परिस्थिती
- एथर एनर्जीने लॉन्च केली भन्नाट स्कूटर! चालकाला आधीच कळेल रस्त्यांवरील खड्ड्यांची माहिती
- Share Market Investment: शेअर मार्केट गुंतवणुकीतून लाखोत फायदा मिळवायचाय? ‘हे’ क्षेत्र ठरेल फायद्याचे… बघा कारणे
- LIC Scheme: मुलांच्या शिक्षणासाठी दररोज 150 रुपये जमा करा आणि 26 लाखांचा परतावा मिळवा! बघा माहिती
- Mahindra Car: थार, स्कॉर्पिओ आणि बोलेरो घेण्याची सुवर्णसंधी! झाल्या 1.56 लाखापर्यंत स्वस्त…बघा स्वस्त झालेल्या कारची यादी