‘त्या’ कुटुंबाच्या हत्याकांडातील आरोपींना फाशी द्या

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :-  बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मांग वडगाव येथील पारधी समाजातील ३ जणांची हत्या करणाऱ्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी.

सदर खुनाचा खटला जलद गती न्यायालयात चालवावा व हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या वारसांना आरोपी निंबाळकरांची संपत्ती विकून प्रत्येकी १५ लाख रुपये मदत करावी

अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव तथा आदिवासी भटके विमुक्त आघाडीचे राज्य समन्वयक प्रा. किसन चव्हाण व सह समन्वयक ॲड. डॉ. अरुण जाधव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

मांग वडगाव (तालुका केज जिल्हा बीड) येथील पारधी समाजातील बाबू शंकर पवार यांच्यासह त्यांची २ मुले प्रकाश बाबू पवार, व संजय बाबू पवार या तिघा बाप लेकांच्या

१३ मे रोजी शेतीच्या वादातून सुरुवातीला अंगावर ट्रॅक्टर घालून, जायबंदी करून व नंतर तलवार व कुऱ्हाडीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली.

निंबाळकर कुटुंबीय कसत असलेल्या शेत जमिनीचा निकाल पवार कुटुंबियांच्या बाजूने लागला. या रागातून नियोजन बद्ध पध्दतीने हे हत्याकांड करण्यात आले.

उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी येथे १९७७ साली शेताच्या वादावरून पारधी समाजातील ११ जणांना जाळपोळ करून ठार मारले होते. या हत्याकांडात तेथील बड्या राजकीय कुटुंबाचा प्रत्यक्ष सहभाग होता.

या हत्याकांडानंतर त्या परिसरातील पारधी समाजातील अनेक कुटुंबांनी इतरत्र स्थलांतर केले होते. त्यापैकी बाबू पवार यांचे कुटुंब मांग वडगाव येथे वास्तव्यास आले होते.

तेथेही पवार व निंबाळकर कुटुंबीयांचा शेत जमिनीवरून वाद झाला होता. व त्यात निंबाळकर कुटुंबातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्या खुनाचा सूड घेण्यासाठी निंबाळकर कुटुंबाने १३ मे रोजी हे हत्याकांड घडवून आणले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe