अहमदनगर Live24 ,17 मे 2020 :- कोरोनाच्या संकटात हवालदिल झालेल्या जनतेला आर्थिक मदतीची तात्काळ गरज असताना मोदी सरकारने आर्थिक पॅकेजच्या नावाने जनतेची क्रूर थट्टा केली आहे.
पॅकेजच्या नावातून मदत हा शब्द गायब केला असून हे आता कर्ज पॅकेज राहिले आहे. मोदी सरकारकडे जनतेला तात्काळ दिलासा देण्याकरिता कोणतीही ठोस योजना नसल्याने
आता जनतेला तहान लागली असताना सरकार जनतेला स्वत:च कर्ज घेऊन विहीर खोदा असा आत्मनिर्भरतेचा सल्ला देत आहे, अशी प्रखर टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
यासंदर्भात पत्रकारांशी बोलताना ना. थोरात म्हणाले की, तीन दिवसांमध्ये अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी जनतेची फसवणूक करण्यासाठी ३५ कलमी योजना आणली आहे.
यामध्ये आर्थिक ताकद मिळवायची असेल तर आता रोपटे लावा आणि पाच वर्षाने त्याची फळे खा, असा सल्ला दिला आहे. त्यांनी जाहीर केलेल्या बहुसंख्य योजना या भविष्यकालीन असून यातील अनेक योजना यापूर्वीच अर्थसंकल्पात जाहीर केल्या आहेत.
मधमाशीपालन, कोल्ड स्टोरेज आणि गोदामे याबाबतच्या योजना आधीच अस्तित्वात आहेत. आज शेतकऱ्यांना आपली उत्पादने कशी विकायची, याची चिंता असताना गोदामे बांधून तयार होईपर्यंत शेतकरी कसा जगेल? असा प्रश्न ना. थोरात यांनी उपस्थित केला.
नाशवंत शेतीमालाची विक्री करण्याकरिता अनुदान देण्याचा निर्णय सरकारने घेतला परंतु ज्या शेतकऱ्यांचा माल नाश पावला आहे त्यांना नुकसानभरपाई देणे आवश्यक होते.
लॉकडाऊनच्या काळात अनेक शेतकऱ्यांना अल्प दरात माल विकावा लागला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या शेतकऱ्यांना थेट रोख रकमेच्या स्वरूपात मदतीची गरज आहे.
त्यांच्या तोंडाला अर्थमंर्त्यांनी पाने पुसली आहेत. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या गरिबांना भविष्यकालीन योजनांची नाही तर रोख रकमेची आवश्यकता आहे.
त्यामुळे खासदार राहुल गांधी यांनी सांगितल्याप्रमाणे केंद्र सरकारने गरजू नागरिकांच्या खात्यात थेट रक्कम जमा करावी, असेही ना. थोरात म्हणाले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com