FD Interest Rate : तुम्ही सध्या उत्तम गुंतवणूक योजना शोधत असाल तर तुमच्यासाठी आज आम्ही एक उत्तम योजना घेऊन आलो आहोत. येथे सुरक्षेसह तुम्हाला उत्तम परतावा देखील मिळेल. तुम्ही FD मध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकता. एफडीमध्ये गुंतवणूक करणे हा सर्वात सुरक्षित मार्ग आहे.
एफडीवरील व्याजदर बँका वेळोवेळी बदलत असतात. गेल्या एका वर्षात आरबीआयने रेपो दरात 250 बेसिस पॉईंटची वाढ केली. यानंतर बँकांनीही व्याजदरात झपाट्याने वाढ केली आहे. यामध्ये स्मॉल फायनान्स बँकांनी जास्त प्रमाणात व्याजदर वाढवले. आज आपण अशाच स्मॉल फायनान्स बँकांच्या व्याजदराबद्दल जाणून घेणार आहोत, जिथे सर्वाधिक व्याजदर ऑफर केले जातात.
एफडीवर सार्वधिक व्याजदर देणाऱ्या बँका !
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक
सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक सध्या 4 टक्के ते 8.60 टक्के वार्षिक व्याजदर देत आहे. बँक दोन ते तीन वर्षांच्या कालावधीसाठी सर्वाधिक 8.60% व्याज दर देत आहे. बँकेने 7 ऑगस्ट 2023 पासून नवीन दर लागू केले आहेत.
युनिटी स्मॉल फायनान्स बँक
युनिटी स्मॉल फायनान्स बँक 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसह एफडी ऑफर करत आहे. बँक वेगवेगळ्या कालावधीसाठी 4.50 टक्के ते 9 टक्के व्याजदर देत आहे. बँक 1001 दिवसांच्या कालावधीसाठी 9 टक्के व्याजदर देत आहे. त्याच वेळी, 1002 दिवस ते 3 वर्षे या कालावधीसाठी 7.65 टक्के व्याजदर उपलब्ध आहे.
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँक
फिनकेअर स्मॉल फायनान्स बँकेत 7 दिवसांपासून ते 10 वर्षांपर्यंत FD देखील करू शकता. येथे 3 टक्के ते 8.61 टक्के व्याजदर दिले जात आहेत. बँक 750 दिवसांच्या म्हणजे सुमारे दोन वर्षांच्या FD वर 8.61 टक्के व्याजदर देत आहे. त्याच वेळी, 751 दिवसांपासून ते अडीच वर्षांच्या एफडीवर 8.15 टक्के व्याज उपलब्ध आहे. हे दर 28 ऑक्टोबर 2023 पासून लागू आहेत.
ESAF स्मॉल फायनान्स बँक
ESAF स्मॉल फायनान्स बँक 10 वर्षांपर्यंतच्या FD साठी 8.50 टक्के व्याज देते. दोन वर्षांपेक्षा जास्त आणि तीन वर्षांपेक्षा कमी मुदतीच्या FD वर 8.50 टक्के व्याजदर उपलब्ध आहे. हे दर 14 एप्रिल 2023 रोजी बँकेने लागू केले होते.
जन स्मॉल फायनान्स बँक
जन स्मॉल फायनान्स बँक 3 ते 8.50 टक्के दराने व्याज देत आहे. हा व्याजदर वेगवेगळ्या कालावधीनुसार दिला जातो. जन स्मॉल फायनान्स बँकेत, दोन ते तीन वर्षांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या एफडीवर व्याजदर ८.५ टक्के आहे.