Solar generator:- दिवसेंदिवस दैनंदिन विजेची गरज प्रचंड प्रमाणात वाढत असून विज तयार करण्यासाठी लागणारे साधने मर्यादित असल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये विजेचे संकट निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सौर ऊर्जा वापराला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन दिले जात आहे.
याकरिता केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विविध योजना राबविण्यात येत असून याकरिता पीएम कुसुम सोलर योजना आणि महाराष्ट्र राज्य सरकारचे मुख्यमंत्री सौर कृषी योजना यासारख्या योजनांचा आपल्याला समावेश करता येईल.सौर ऊर्जा वापराला प्रोत्साहन मिळावे म्हणून सौर पॅनल आणि सौर कृषी पंप बसवण्याकरिता देखील या योजनांच्या माध्यमातून अनुदान स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते.

याशिवाय अनेक सौर उपकरणे देखील विकसित करण्यात येत असून त्यांचा वापर तुम्ही विविध कामाकरता करू शकतात. सौर उपकरणाचा विचार केला तर यामध्ये सौर उर्जेवर चालणारी ही उपकरणे असल्यामुळे या उपकरणांना विजेची गरज भासत नाही. त्यामुळे साहजिकच विजेची बचत तर होतेच परंतु विजेवर होणारा महिन्याचा खर्च देखील वाचतो.
घरगुती पातळीवर जर विचार केला तर सर्वात जास्त विजेचा वापर हा घरातील कुलर किंवा पंखा आणि टीव्ही व इतर तत्सम उपकरणे चालवण्यासाठी केला जातो. परंतु ही उपकरणे जर विजेशिवाय चालवणे शक्य झाले तर खूप मोठ्या प्रमाणावर विजेची बचत तर होईलच परंतु वीज बिलावरचा होणारा खर्च देखील वाचेल.
याच अनुषंगाने आपण या लेखामध्ये पोर्टेबल सोलर जनरेटर या उपकरणाची माहिती घेणार असून या उपकरणाच्या साह्याने तुम्ही तुमच्या घरातील पंखा, टीव्ही तसेच कम्प्युटर व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे विजेशिवाय चालवू शकतात.
पोर्टेबल सोलर जनरेटर आहे फायद्याचे
एसआर पोर्टेबल सोलर जनरेटर हे एक सौर ऊर्जा जनरेटर असून ते घरातील सर्व उपकरणांसाठी वीजपुरवठा पुरवण्यासाठी सक्षम आहे. या माध्यमातून तुम्ही घरातील पंखा, टीव्ही तसेच कम्प्युटर व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे आरामात चालवू शकतात. या पोर्टेबल सोलर जनरेटर चा आकार खूपच लहान असल्यामुळे ते तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे सहज शक्य होते.
तसेच महत्त्वाचे म्हणजे हे सोलर जनरेटर कित्येक तासांपर्यंत पावर बॅकअप देण्यास देखील सक्षम आहे. जेव्हा इलेक्ट्रिक ग्रेडच्या माध्यमातून होणारा विजेचा पुरवठा खंडित होतो किंवा थांबतो अशाप्रसंगी तुम्ही या सौर ऊर्जा जनरेटर चा वापर करून घरातील उपकरणे सुरू ठेवू शकतात. त्यामुळे दैनंदिन आयुष्यामध्ये किंवा कामात तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही.
कसे आहे या एसआर पोर्टेबल सोलर जनरेटरचे स्वरुप?
विजेचा पुरवठा करण्यासाठी तुम्ही या सोलर जनरेटर चा वापर अतिशय सहजपणे करू शकतात. हा 130 वॅट क्षमतेचा पोर्टेबल सोलर जनरेटर असून यामध्ये दोन एसी कनेक्टर पोर्ट आहेत व या माध्यमातून हे जनरेटर 100 वॅट्सचे एसी आउटपुट प्रदान करते. या सोलर जनरेटर सोबत तुम्हाला एक Li-Ion बॅटरी पॅक देखील मिळतो व तो तुम्हाला दीर्घकाळ विजेचा पुरवठा करण्यासाठी फायद्याचा ठरतो.
तसेच या सोबत तुम्हाला एक पावरफुल असा एलईडी लाईट देखील मिळतो. या एलईडी लाईट चा वापर तुम्ही घरामध्ये करू शकतात किंवा एखाद्या ठिकाणी गेले तर ट्रिप साठी देखील तुम्हाला याचा वापर करता येतो. अशा पद्धतीने या स्वस्त मध्ये मिळणाऱ्या पोर्टेबल सोलर जनरेटरचा वापर तुमच्यासाठी आरामात करू शकतात.
किती आहे याची किंमत?
या प्रकारचे सोलर पावर जनरेटर हे ॲमेझॉन वर देखील उपलब्ध असून त्यामध्ये 1.89 kg वजनाचे व दोन डीसी पोर्ट असलेले व त्यासोबत तीन यूएसबी पोर्ट देण्यात आलेले असून एलईडी फ्लॅश लाईट आणि लिथियम आयोन बॅटरी देखील आहे. याची जर आपण ॲमेझॉन वर प्राईस पाहिली तर ती साधारणपणे 18000 रुपये इतकी आहे. अमेझॉन वर या प्रकारचे सोलर जनरेटर हे ईएमआय वर देखील उपलब्ध असून साधारणपणे 873 रुपये इतका त्याचा ईएमआय आहे.