खळबळजनक ! बस स्थानकावर आढळला कोरोना रुग्णाचा बेवारस मृतदेह

Ahmednagarlive24
Published:

अहमदाबमधील एका बस स्थानकावर खळबळजनक प्रकार घडला आहे. याठिकाणी एक बेवारस मृतदेह आढळला असून तो कोरोना ग्रस्त असल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी मृतांच्या नातेवाईकांनी पोलीस कर्मचार्‍यांना आणि रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांना दोषी ठरवले आहे. राज्य सरकारने याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

तसेच 24 तासात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मृत रुग्णाचे नाव छगन मकवाना असून 13 मे रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे कळाले. त्यानंतर मकवाना यांच्या कुटुंबीयांना क्वारंटाईन करण्यात आले होते.

मकवाना यांचे भाऊ गोविंद म्हणाले की, मकवाना यांचा मृतदेह बीआरटीएस बस स्थानकावर बेवारस पडला होता.

पोलिसांना याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी मकवाना यांचा मृतदेह ताब्यात घेऊन एका रुग्णालयात नेला. मकवाना यांच्या कुटुंबीयांना मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment