Ahmednagar News : साध्याच राजकारण अगदीच वेगळ्या वळणावर गेलेले दिसत आहे. त्यातच आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या हिशोबाने अहमदनगर मध्ये तर आरोप, प्रत्यारोपांचे फटाकेच फुटत आहेत.
यात जास्त करून एकीकडे विखे व दुरीकडे एकवटलेले विखे विरोधक असच राजकारण दिसत आहे. मागील काही दिवसांत आरोपींच्या फैरी अगदी टोकापर्यंत पोहोचल्या आहेत. परंतु आता खा. सुजय विखे यांनी एका सभेत जे बेधडक वक्तव्य केले आहेत
त्याने मात्र भल्या भाल्याने बोटे तोंडात घातली आहेत. त्यांच्या बेधडक वक्तव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे.
काय आहेत खा. विखेंचे बेधडक वक्तव्य
एका सभेत बोलताना विखे म्हणाले की, रात्री कोण कुणाच्या घरी जातं, याचे माझ्याकडे व्हिडीओ आले आहेत. आता वेळ आल्यावर हे काय करतात हे सगळ्यांना पुराव्यांसह दाखवणार आहे असे ते उघड सभेत म्हणाले आहेत.
तसेच पुढे बोलताना ते म्हणाले, कुणाचं खातं कोणत्या बँकेत आहे, कोण कुठं जातं, कोण रात्री बाहेर पडतं, कुणाच्या घरी जात याची माहिती काढली आहे. मला ज्यावेळी समजलं तर मी लगेच ६ महिन्यांपूर्वीच यांच्यामागे लोकं पाठवली आहेत.
त्यामुळे आता सगळं पुराव्यानिशी दाखवतो एकदा याना उभं राहू द्या असा इशाराच दिलाय. ते इतक्यावरच थांबले नाहीत. तर त्यांनी पुढे असेही म्हटले आहे की, माझ्याकडे सगळ्यांची उत्तरं असून वेळ आल्यावर सर्व व्हिडीओ दाखवेल व आरोप करणाऱ्यांचे कपडेही उतरवलं असे ते म्हणालेत.
रोख कुणाकडे ?
या बेधडक वक्तव्यानंतर खा. विखेंचा रोख नेमका कुणाकडे होता याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. परंतु त्यांच्या अशा वक्तव्याने आता विविध अर्थ काढले जाऊ लागले आहेत. राजकीय वातावरणात विविध चर्चाना पेव फुटले आहे.