Ahmednagar Politics : सरकार फक्त घोषणा करते. दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले – आमदार प्राजक्त तनपुरे

Ahmednagarlive24 office
Published:

पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळाल्या याचे खरोखर समाधान लाभले आहे. सध्याचे सरकार फक्त घोषणा करते. दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. असे टिकास्त्र आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विद्यमान सरकारवर सोडले.

नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी- वडगाव गुप्ता येथील शेतकऱ्यांनी १००० हेक्टर शेत जमिनीवरील महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाचे शिक्के कमी करण्यात आल्यामुळे आ. प्राजक्त तनपुरे यांची लाडू तुला केली. यावेळी ते बोलत होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाध्यक्ष प्रा. शशिकांत गाडे होते. पिंपळगाव माळवी येथे रविवारी विविध विकास कामांचा शुभारंभ व लोकार्पण सोहळा आमदार तनपुरे यांच्या हस्ते पार पडला.

यामध्ये भोपते तलाव दुरुस्ती, सिनानदी नवीन पुल व वीज रोहित्राचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी शेतकरी जालिंदर गुंड यांनी शेतकऱ्यांच्या वतीने आमदार तनपुरे यांचे आभार मानले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कारले, जि.प. उपाध्यक्ष प्रताप शेळके, बाळासाहेब हराळ, राजेंद्र भगत, प्रा. रघुनाथ झिने, ग्रामपंचायत सदस्य सागर गुंड, इंद्रभान बारगळ, संगीता झिने, राम झिणे, बाबासाहेब झीने, डॉ. राम कदम, आबा सातपुते व ग्रामस्थ उपस्थित होते.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe