अंगणवाडी कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागणे ही लाजीरवाणी बाब !

Ahmednagarlive24 office
Published:

अंगणवाडी सेविका या ग्रामीण भागातील भावी पिढी घडविण्याचे महत्वपूर्ण काम करीत असतात. त्यांना रस्त्यावर उतरावे लागणे, ही खरेच लांच्छनास्पद बाब असून अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या,

त्यांचे प्रश्न आपण विधानसभेत उपस्थित करून त्यांना न्याय मिळवून देण्याचा निश्चित प्रयत्न करू, असा विश्वास माजी राज्यमंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांना दिले.

संपात राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी सहभागी होणार आहेत. सबब शासनाने त्यांच्या विविध प्रश्नांची तातडीने सोडवणुक न केल्याने दि. ४ डिसेंबरपासुन राज्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याची नोटीस व निवेदन शासनास व आमदार तनपुरे यांना देण्यात आली. यावेळी माजी नगराध्यक्षा डॉ. उषाताई तनपुरे, सोनालीताई प्राजक्त तनपुरे उपस्थित होत्या.

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, सन्मानजनक वेतनवाढ, दरमहा पेन्शन यासह विविध मागण्यांची सोडवणुकीकरिता गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यभर आंदोलने सुरु होती.

राज्य शासन व प्रशासनाशी वारंवार बैठका होऊन चर्चाही करण्यात आलेली होती; परंतु मागण्यांची सोडवणुक करण्याऐवजी राज्य सरकार त्याकडे जाणीवपुर्वक करत असल्याच्या निषेधार्थ

महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समितीच्या वतीने दि. ४ डिसेंबरपासुन राज्यभर बेमुदत संप जाहीर केलेला आहे. तसेच नोव्हेंबर महिन्यातील कुठल्याही प्रकारची माहिती, अहवाल देणे तसेच मासिक बैठकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय कृती समितीचे घेतलेला आहे.

उपस्थित अंगणवाडी सेविका व मदतनीस यांनी डॉ उषाताई तनपुरे व सोनालीताई तनपुरे यांच्या समोर आपल्या मागण्या मांडल्या. यावेळी कॉ. मदिना शेख, अध्यक्ष, कॉ. राजेंद्र बावके सरचिटणीस, कॉ. जीवन सुरुडे,

सहचिटणीस, शरद संसारे जिल्हा उपाध्यक्ष, शिल्पा देशमुख, संगीता डोंगरे, सुनीता धसाळ, सुजाता शिंदे, भागीरथी पवार, मालन माळी, शोभा पवार यांच्यासह तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस उपस्थित होत्या.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe