धक्कादायक : पारनेरमध्ये पुन्हा एकाचा मृत्यू,कारण मात्र अस्पष्ट !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,18 मे 2020 :-  पारनेर तालुक्यात श्वसनाचा त्रास होत असलेल्या एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने रविवार दि.१७ मे ला सायंकाळी दरोडी येथील तरुणास तत्काळ अहमदनगर ला हलविले होते.

आज सोमवार दि.१८ मे ला शासकीय रुग्णालयात त्याच्या घशातील स्रावाचे नमुने घेण्यात आले.

नमुने तपासणीसाठी पाठविण्यात असुन, उपचार चालु असताना उपचारा दरम्यान त्याचा मृत्यु झाला आहे.

आज संध्याकाळपर्यंत घशातील स्रावाचा अहवाल आल्यावर त्याचा मृत्यु नक्की कशामुळे झाला याचा उलगडा होईल

असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश लाळगे यांनी याबाबत बोलताना सांगितले . 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment