आगामी वर्षात अर्थातच 2024 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकांचा मोठा थरार रंगणार आहे. 5 वर्षांनी पुन्हा एकदा लोकशाहीचा आखाडा सजणार आहे. येथे सर्वसामान्य जनता आपल्या अधिकाराचा वापर करत त्यांचे अधिकाराचे रक्षण करणाऱ्या लोकांना नियुक्त करणार आहेत. तर इकडे आपल्याचं पक्षाला विजयश्री मिळावा आणि पुन्हा एकदा सत्ता काबीज करता यावी यासाठी सत्ता पक्षातील नेत्यांनी आत्तापासूनच मोर्चे बांधणी सुरू केली आहे.
सर्वसामान्य नागरिकांना खुश करण्यासाठी मोदी सरकार देखील वेगवेगळे निर्णय घेत आहेत. नुकत्याच काही दिवसांपूर्वी देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. भारतीय निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या या निकालात भारतीय जनता पार्टीने पुन्हा एकदा विजयी पताका फडकवली आहे. नुकत्याच झालेल्या पाच राज्यांपैकी 3 राज्यांमधील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी सत्ता स्थापित करण्यात यशस्वी ठरली आहे.
मोदी सरकारने केलेल्या विकास कामांमुळे पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर विश्वास दाखवला आहे. खरतर केंद्रातील सरकारने 2014 मध्ये सत्ता स्थापित केल्यानंतर अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत. मोदी सरकारने नागरिकांना घर बांधण्यासाठी 1.30 लाख रुपये देत आहे.
पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ही रक्कम नागरिकांना दिले जात आहे. होय, जर तुम्हालाही ग्रामीण भागात घर असण्याचे तुमचे स्वप्न साकार करायचे असेल, तर केंद्रातील मोदी सरकारची ही योजना तुम्हाला मोठ्या प्रमाणात मदत करणार आहे. सरकारने ही स्कीम 1 एप्रिल 2016 पासून लागू केली आहे.
योजना लागू केली त्यावेळी या योजनेंतर्गत २.९५ कोटी घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र आतापर्यंत या योजनेअंतर्गत सरकारने 2.50 कोटी घरांचे बांधकाम पूर्ण केले आहे. विशेष म्हणजे उद्दिष्टांपैकी बाकी असलेल्या घरांचे देखील लवकरच काम पूर्ण होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे.
सरकार राज्य सरकारच्या सहकार्याने ग्रामीण भागात राहणाऱ्या लोकांना घरे बांधण्यासाठी मदत करत आहे. ज्या लोकांकडे अजून पक्के घर नाहीये अशा लोकांना या योजनेअंतर्गत घर उपलब्ध करून दिले जात आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना कायमस्वरूपी घरे बांधण्यासाठी केंद्र सरकार मैदानी भागात 1.2 लाख रुपये आणि डोंगराळ भागात 1.3 लाख रुपये देत आहे.
तसेच मनरेगा अंतर्गत 18 हजार रुपयांपर्यंतची मजुरी आणि बारा हजार रुपये संडास बांधण्यासाठी मिळणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या सरकारी कार्यालयाला किंवा प्रधानमंत्री आवास योजनेच्या वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.