Naukri News: ‘या’ महानगरपालिकेत 10 वी आणि 12 वी पास असलेल्यांना नोकरीची सुवर्णसंधी! वाचा या भरतीची संपूर्ण माहिती

Ajay Patil
Published:
job vacancy

Naukri News:  सध्या राज्य शासनाच्या विविध विभागांतर्गत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून कोरोना कालावधीत शासनाकडून सगळ्या भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आलेल्या होत्या. परंतु गेल्या काही दिवसांपासून या संपूर्ण भरती प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आलेल्या असून अनेक रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात देखील आलेले आहेत.

त्यामध्ये आपल्याला तलाठी भरती तसेच वनरक्षक यासारख्या रिक्त पदांसाठी परीक्षा पार पडल्या असून आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये पुढील प्रक्रिया सुरू होणारी आहे. त्यानंतर राज्यातील विविध महानगरपालिकेत देखील भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत.

यामध्ये जर पाहिले तर बृहन्मुंबई महानगरपालिकेत देखील सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याच भरती प्रक्रिया विषयी या लेखात आपण माहिती घेणार आहोत.

 मुंबई महानगरपालिकेत शिपाई इतर पदांसाठी भरती

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग बीएमसीत काम करण्यासाठी रिक्त पदे भरण्यात येत असून या रिक्त पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज देखील मागवण्यात आलेले आहेत. या माध्यमातून शिपाई व इतर अनेक पदांसाठी भरती करण्यात येणार असून याकरिता पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करणे गरजेचे आहे

या भरतीची जाहिरात बृहन्मुंबई महानगरपालिका व कार्यकारी आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेली असून पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. ही भरती राज्य सरकार श्रेणी अंतर्गत पार पडणार असून या माध्यमातून शिपाई व इतर पदे भरली जाणार आहेत.

याकरिता इयत्ता दहावी पासून पुढे शैक्षणिक पात्र असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना तीस हजार रुपये( पदानुसार मासिक वेतन मिळणार आहे.) या भरती करिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहेत. यामध्ये लक्षात घेण्याची बाब म्हणजे सर्व पदे कंत्राटी पद्धतीने भरती केले जाणार आहेत.

 या रिक्त पदांसाठी होणार आहे भरती

ही भरती सहाय्यक प्राध्यापक नेत्रविज्ञान, सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, बालरोग सल्लागार( पूर्णवेळ ), वैद्यकीय अधिकार( पूर्ण वेळ ग्रेड l) ऑडिओ लॉजिस्ट आणि स्पीच थेरपीस्ट, स्टाफ नर्स, विशेष शिक्षक ग्रेड l, विशेष शिक्षक ग्रेड ll, ऑर्थोपेडिक सल्लागार ( अंश वेळ ), दंत तंत्रज्ञ, भूलतज्ञ( अंश वेळ ), व्यावसायिक समुपदेशक( अंश वेळ ), पूर्णवेळ ग्रेड ll ऑडिओ लॉजिस्ट आणि स्पीच थेरपीस्ट, शिपाई या पदांकरिता ही भरती प्रक्रिया होणार आहे.

 मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांनी हे करावे

बीएमसी द्वारे मुलाखतीसाठी जे उमेदवार निवडले जातील त्यांना मुलाखतीसाठी आणि कंत्राटी भरतीच्या पुढील प्रक्रिया करिता मेल आणि मोबाईलवर संदेशाद्वारे सूचित केले जाणार आहे. यामध्ये सूचनापत्रात नमूद केल्यानुसार डेटा तपासण्यासाठी ओरिजनल प्रमाणपत्र आणि साक्षांकित झेरॉक्स प्रति प्रिंट काढून आणणे गरजेचे आहे.

 अर्ज कुठे पाठवावा?

यासाठी ऑफलाईन अर्ज करावा लागणार असून तो अर्ज तुम्हाला डिस्पॅच विभाग, जी बिल्डिंग, टी. एन. मेडिकलचा तळमजला कॉलेज आणि नायर हॉस्पिटल,मुंबई -400008 या पत्त्यावर पाठवावे लागणार आहेत.

 अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक

ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक हा 15 डिसेंबर 2023 पर्यंत असणार आहे.

या भरतीच्या अधिक माहिती करिता संपूर्ण जाहिरात बीएमसीच्या संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. ती जाहिरात संपूर्णपणे वाचावी.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe