Job News: ‘या’ महानगरपालिकेत पदवीधरांसाठी आहे नोकरीची सुवर्णसंधी! वाचा आणि करा अर्ज

Ajay Patil
Published:

Job News:- राज्य शासनाच्या विविध विभागांतर्गत आता भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून जिल्हा परिषद अंतर्गत असो किंवा महानगरपालिका अंतर्गत अनेक भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहेत व काही भरती प्रक्रियांच्या नोटिफिकेशन देखील प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.

त्यामुळे विविध परीक्षांची तयारी करण्याऱ्या आणि नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांकरिता या कालावधीत मोठ्या प्रमाणावर संधी चालून आलेले आहेत. कोरोना कालावधीपासून थांबलेल्या अनेक विभागांतर्गत भरती प्रक्रियाना आता वेग देण्यात येत असून या संधीचे सोने करण्याची आता आवश्यकता आहे.

अगदी याच पद्धतीने जर आपण महानगरपालिकांच्या अंतर्गत येणाऱ्या भरती प्रक्रियांचा विचार केला तर मुंबई महानगरपालिका व्यतिरिक्त आता पुणे महानगरपालिकेत देखील रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. याच भरती विषयाची सविस्तर माहिती या लेखात आपण बघणार आहोत.

 पुणे महानगरपालिकेत एकूण 16 रिक्त जागांसाठी भरती

पुणे महानगरपालिके अंतर्गत भरती निघाली असून एकूण सोळा रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही भरती प्रक्रिया प्रामुख्याने क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर या रिक्त पदासाठी राबवण्यात येणार आहे.

 काय आहे यासाठीची शैक्षणिक पात्रता?

क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर या पदासाठी शैक्षणिक पात्रता पाहिली तर ती पदवी( बीएससी) उत्तीर्ण असणे गरजेचे असून 40 w.p.m ( इंग्रजी टायपिंग)इतकी टायपिंगची गती असलेले सरकारी व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे आणि मराठी टायपिंग करिता 30 w.p.m असणे गरजेचे आहे.

 किती आहे वयोमर्यादा?

या भरती प्रक्रिया करिता उमेदवाराचे वय हे खुल्या प्रवर्गाकरिता 38 वर्ष आणि मागासवर्गीय उमेदवारांकरिता 43 वर्षांपर्यंत आहे.

 किती लागेल परीक्षा फी?

या भरती करिता कुठल्याही प्रकारची परीक्षा फी लागणार नाही.

 निवड झालेल्या उमेदवारांना किती मिळेल पगार?

या पदाकरिता ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना 21 हजार 840 रुपये इतका मासिक पगार असेल.

 अर्ज करता कुठली कागदपत्रे लागतील?

या भरती करता अर्ज करण्यासाठी प्रामुख्याने उमेदवाराला फोटो आयडी म्हणून आधार कार्ड/पासपोर्ट/ ड्रायव्हिंग लायसन्स / पॅन कार्ड इत्यादी, जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला / रहिवासी दाखला इत्यादी, शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र, पदवी उत्तीर्ण असल्याचे मार्कशीट, टायपिंगचे प्रमाणपत्र, एमएससीआयटी प्रमाणपत्र, एक्सपिरीयन्स सर्टिफिकेट आणि जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र( आवश्यक असल्यास ) इत्यादी कागदपत्रे लागतील.

 अर्ज पाठवण्याचा पत्ता?

या भरती करिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे असून हे अर्ज भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे या पत्त्यावर पाठवायचे आहेत.

 अर्ज करण्याची शेवटची तारीख

या भरती करिता अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 16 डिसेंबर 2023 ही आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe