धाकधुकीच्या जीवनात सर्वांचीच लाइफस्टाइल बदलली आहे. खाण्या पिण्याच्या बदलत्या सवयींमुळे अनेक विकार वाढत चालले आहेत. व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, पाणी तसेच आहार यांविषयी अयोग्य पद्धतीचे नियोजन आदींमुळे ‘किडनीविकार’ सध्या वाढताना दिसत आहेत. यात रुग्णाला अश्या वेदना होत असतात. यासाठी काही घरगुती पदार्थांचा आहारात समावेश केला तर नक्कीच किडनी विकारापासून दूर राहता येईल. चला जाणून घेऊयात
पाणी
पाण्याला जीवन असे म्हटले जाते. पोटभर आणि पुरेसे पाणी घेतल्याने किडनीचे आरोग्य उत्तम राहते. शरीरात भरपूर पाणी असेल तर शरीर हायड्रेट रहते. पाण्यामुळे शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर टाकण्यास मदत होते.
कुळीथ
बऱ्याच लोकांना थांबून थांबून लघवी होणे किंवा मुत्रमार्गात रेतीचे कण येणे आदी व्याधी उद्भवतात. या समस्या दूर जाण्यासाठी काळे कुळीथ खाणे गुणकारी असल्याचे म्हटले जाते.
लसूण
लसूण हा बहुगुणी आहे. स्वयंपाकात तर त्याशिवाय चवच नाही. लसणातील सल्फाईड द्रव्य किडनीमधील संसर्ग दूर करण्यास फायदेशीर ठरतात. लसणाच्या सेवनाने मुत्रपिंडांना उत्तेजन मिळून लघवीचे प्रमाण वाढते व विषारी व अपायकारक घटक बाहेर पडतात.
कोरफड
कोरफ़ड मध्ये जंतूनाशक गुणधर्म असतात. ते किडनीचे संसर्ग दूर ठेवतात. रोज दोनदा कोरफडीचा रस पिल्यास किडनीचे आरोग्य चांगले राहते.
मुळा
मुळा हे सर्वत्र उपलब्ध होणारे आणि बहुतांश किचनमध्ये असणारे भाजीपाला आहे. भाज्यांमध्ये किंवा भाजीबरोबर खाण्यासाठी मुळा वापरला जातो. मुळ्यामध्ये नैसर्गिकरित्या किडनी स्वच्छ ठेवण्याचे गन असतात. मुळ्याच्या ताज्या पानांचा रस घेतल्यानेही किडनीविकारात अराम पडतो.
बेकिंग सोडा
बेकिंग सोडा अर्थात खाण्याचा सोडा सर्वत्र उपलब्ध असतो. सोडियम बायकर्बोनेटमुळे किडनीविकार कमी होण्यास मदत होते. पाण्यात बेकिंग सोडा टाकून ते पाणी प्यायल्यास किडनीविकारात आराम मिळतो.
फलाहार
फळांचा आहार घेणे किंवा फळांचा रस घेणे हे मुत्रविकारांना दूर ठेवण्यास रामबाण उपाय आहे. संत्री, लिंबू,कलिंगड आदी फळांचा रस घेतल्याने मुत्रमार्ग स्वच्छ होतो.
गूळ
गुळामध्ये वात, पित्त, कफ यांना दूर करण्यास मदत करणारे घटक असतात. त्यामुळे मुतखड्याच्या विकारात गुळाचे सेवन करणे फ़ायदेशीर मानले जाते.