Ahmadnagar Breaking : रेल्वे पोलिसांच्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झाल्याची फिर्याद दाखल झाली होती. १ ऑगस्ट रोजी विशाल नागनाथ धेंडे (३५, रा. केडगाव, नगर) या तरुणाचा मृतदेह रेल्वे स्थानकाजवळ रुळाच्या कडेला आढळला होता.
त्याच्या अंगावर अनेक ठिकाणी फॅक्चर, लिव्हरला जखम होती. त्याचा मृत्यू रेल्वे पोलिसांच्या मारहाणीत झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबासह रिपब्लिकन चळवळीतील कार्यकर्त्यांनी केला होता.
यासंदर्भात विशाल धेंडेचा मित्र शरद गुलाब पवार याने फिर्यादही दिली होती. यांसुर आता गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने (सीआयडी) सचिन अशोक वाकसे (३५, मूळ रा. दौंड, सध्या नगर) याच्यासह करण अशोक कलोशिया (रा. नगर रेल्वे स्थानक परिसर) या दोघांना अटक केली आहे.
ह्याबद्दल सविस्तर माहिती अशी कि, १ ऑगस्टला विशाल नागनाथ धेंडे (३५, रा. केडगाव, नगर) या तरुणाचा मृतदेह रेल्वे स्थानकाजवळ रुळाच्या कडेला आढळला होता. त्याचा रेल्वे पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याची फिर्याद दाखल झाल्यानंतर सीआयडी पथकाने तपासाची सूत्रे हलवली.
सचिन अशोक वाकसे (३५, मूळ रा. दौंड, सध्या नगर) याच्यासह करण अशोक कलोशिया (रा. नगर रेल्वे स्थानक परिसर) या दोघांना अटक केली असून सचिन वाकसे हा रेल्वे पोलिस ठाण्यात पोलिस नाईक म्हणून नियुक्त होता.
करण कलोशिया हा रेल्वे पोलिस ठाण्यात सफाई कर्मचारी म्हणून काम करायचा. त्याच्यासह करण कलोशिया याला सोमवारी नगरमध्येच अटक केली. १० ऑगस्टला हा गुन्हा तपासासाठी राज्य गुन्हा अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आलेला होता. त्यानंतर चार महिन्यांनी या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.