Ahmednagar Crime : मैदानावर क्रिकेट खेळण्याच्या वादातून युवकाला लोखंडी रॉडने मारहाण

Ahmednagarlive24 office
Published:

मैदानावर क्रिकेट खेळण्याच्या वादातून सात जणांनी युवकाला लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना सोमवारी रात्री मुकुंदनगरमधील बडी मरीयम मस्जिदजवळ घडली.

जैद नुरमोहम्मद सय्यद (वय २०, रा. सीआयव्ही कॉलनी, मुकुंदनगर) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

त्याने भिंगार कॅम्प पोलिसांना दिलेल्या जबाबावरून सात जणांविरोधात गंभीर मारहाणीचा गुन्हा मंगळवारी दाखल झाला आहे.

आफशान शेख ऊर्फ आप्पू, माजिद समदखान, नाजिश ऊर्फ मन्या, इम्रान (पूर्ण नाव माहिती नाही), जिशान नौशाद शेख (सर्व रा. मुकुंदनगर) व दोन अनोळखी विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास अंमलदार डी. व्ही. झरेकर करीत आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe