सोनई : नेवासा तालूक्यातील चांदा येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून पळवून नेल्याच्या कारणावरून अहमदनगरजवळील नागापूर येथील चौघा आरोपींना सोनई पोलिसांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या मदतीने अटक केली आहे.
याबाबत पोलीस सूृत्रांकडून समजलेली माहिती अशी, अल्पवयीन मुलीच्या अपहरणाबाबत सोनई पोलीस ठाण्यात २६ मे २०१९ रोजी सायंकाळी ७ वाजता अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल होता.
याबाबतची माहिती मिळाल्यानुसार सोनई पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक कैलास देशमाने यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या मदतीने नागापूर येथे शोध घेऊन चौघा आरोपींना अटक करून पीडित अल्पवयीन मुलीची सुटका केली.
आरोपी सोनू राजू वाघमारे, सुनीता परशू कांबळे, छाया प्रभाकर पठारे, काजल लखन म्हात्रे (सर्व रा. नागापूर, ता. नगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
- Ahilyanagar Breaking : महिंद्रा बोलेरो विहिरीत पडली ! चार जणांचा जागीच मृत्यू
- तुमच्या पत्नीच्या नावे ‘या’ योजनेत खाते उघडा आणि 1 कोटी 12 लाखांचा परतावा मिळवा! जाणून घ्या कॅल्क्युलेशन
- अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणत्या कारखान्याने दिला किती दर ? शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी
- एचडीएफसीच्या ‘या’ योजनेने गुंतवणूकदारांना केले कोट्याधीश! महिन्याला 2 हजाराची गुंतवणूक करून मिळाले 4 कोटी
- तुमच्याकडेही आहे का एनटीपीसी ग्रीन एनर्जीचा शेअर? तज्ञांकडून देण्यात आले SELL रेटिंग! कारण की…..