Ahmadnagar Braking : अहमदनगर जिल्ह्यातील अपघातांची मालिका संपत संपेना. मागील काही दिवसांत अपघाताच्या अनेक भीषण घटना घडल्या. यात आखणी आपले प्राणही गमावले. आज शनिवारी (दि.१६ डिसेंबर) सकाळी १० वाजता पुन्हा एक भीषण अपघाताची घटना घडली आहे.
अहमदनगर – सोलापूर महामार्गावरील शिराढोण उड्डाणपुलावर बोलेरो व डंपर यांचा भीषण अपघात झाला असून यात बोलेरोचा चालक जागीच ठार झालाय. मंगेश दिलीप नागवडे (रा.गुणवडी) असे मयत व्यक्तीचे नाव आहे.

आज शनिवारी (दि.१६ डिसेंबर) सकाळी १० च्या सुमारास शिराढोण उड्डाणपुलावर बोलेरो जीप व डंपर यांची समोरासमोर धडक झाली. यामध्ये बोलेरोचा चालक मंगेश दिलीप नागवडे हा जागीच ठार झाला. डंपर चालक जखमी झाल्याचे समजते.
अपघात इतका जोराचा होता की, बोलेरो जीपच्या पुढील भागाचा चुराडा झाला होता. अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले होते. अनियंत्रितपणे वाहने चालवणे, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक नियमांचे पालन न करणे आदी कारणे अपघातामागे असतात.
अनेकदा वाहने चालवताना केली चूक स्वतःसह अनेकांच्या अंगलट येते. त्यामुळे सर्वानी नियमांचे पालन करत, वेगावर नियंत्रण ठेवत वाहने चालवली पाहिजेत असे आवाहन बऱ्याचवेळा करण्यात येते.