बीड बीड जिल्ह्यात अवमानवीय घटना घडली आहे. एका मुख्याध्यापकाने स्वतःच्या दोन मुलींवर बलात्कार केला. त्याने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
धक्कादायक बाब म्हणजे या नराधमाने तिसऱ्या मुलीवरही लैंगिक अत्याचार केले. केज तालुक्यात हा सर्व प्रकार घडला आहे.

आठ वर्षापूर्वी नराधम बापाने त्याच्या पोटच्या मुली सोबत बळजबरीने बलात्कार केला. तसेच दुसऱ्या मुली सोबतही अशाच प्रकारे बलात्कार केला.
तसेच काही दिवसानंतर आई गावाला गेल्यानंतर तिसऱ्या मुलीसोबतही अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला होता. या नराधमाने अत्याचार केल्यानंतर त्यांना मारून टाकण्याची धमकी दिली होती.
यातील एका मुलीनी ही घटना आपल्या मैत्रिणीला सांगितली. मैत्रिणीच्या मावशीच्या मदतीने त्यांनी आपल्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली.
याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून नराधम बापाला बेड्या ठोकण्यात आल्या. या प्रकरणी नराधम बापासह आई, भाऊ, चूलते, चुलतभाऊ यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.













