Navy Recruitment: दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना इंडियन नेव्हीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! वाचा डिटेल्स

Ajay Patil
Published:
Navy Recruitment

Navy Recruitment:- अनेक तरुणांना भारतीय संरक्षण क्षेत्रामध्ये नोकरी करण्याची इच्छा असते व त्यासाठी ते भरपूर प्रमाणात मैदानी चाचणी पासून ते लेखी परीक्षा पर्यंतची तयारी करत असतात. यापैकी बऱ्याच जणांची आर्मी, नेव्ही इत्यादी ठिकाणी नोकरीची फार मनापासून इच्छा असते. भारतीय संरक्षण क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळ्या पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात असते व यामध्ये पदनिहाय शैक्षणिक पात्रता आवश्यक असते.

साधारणपणे इंडियन आर्मीचा विचार केला तर दहावी उत्तीर्ण उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर यात संधी मिळत असते. परंतु त्या दृष्टिकोनातून इंडियन नेव्हीमध्ये दहावी पास उत्तीर्ण उमेदवारांना कमीत कमी संधी मिळते असे मानले जाते.

परंतु सध्या इंडियन नेव्ही अर्थात भारतीय नौदलाने दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांना देखील नोकरीचे सुवर्णसंधी उपलब्ध करून दिलेली असून इंडियन नेव्ही च्या माध्यमातून वरिष्ठ ड्राफ्ट्समन, ट्रेड्समन मेट आणि चार्जमन या विविध कमांड पदांच्या भरतीसाठी उमेदवारांकडून सध्या अर्ज मागवले आहेत. याच भरती विषयीचे संपूर्ण माहिती या लेखात आपण घेणार आहोत.

कोणत्या पदांसाठी आहे ही भरती?

1- यामध्ये ट्रेड्समन मेट या पदाचे 610 पदे रिक्त असून ते प्रामुख्याने पूर्व, पश्चिम आणि दक्षिणे नौदल कमांड या ठिकाणचे आहेत.
2- चार्जमन( दारूगोळा कार्यशाळा आणि कारखाना) 42 पदे रिक्त आहेत.
3- वरिष्ठ ड्राफ्ट्समन( इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, कन्स्ट्रक्शन, कारटोग्राफिक आणि आर्मामेन्ट) 258 पद रिक्त आहेत.
या भरतीसाठी आवश्यक वयोमर्यादा
या भरती करता किमान वयोमर्यादा 18 तर कमाल वयोमर्यादा 25 वर्ष असून वरिष्ठ ड्राफ्ट्समन पदासाठी कमाल वयोमर्यादा 27 वर्षे आहे.

पदनिहाय शैक्षणिक पात्रता

1- ड्राफ्ट्समन- या पदासाठी संबंधित क्षेत्रामध्ये आयटीआय सह दहावी पास उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
2- वरिष्ठ ड्राफ्ट्समन- या पदासाठी आयटीआय किंवा संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा आवश्यक आहे.
3- चार्जमन- या पदासाठी बीएससी किंवा संबंधित क्षेत्रात डिप्लोमा असणे आवश्यक आहे.
उमेदवारांची निवड कशी केली जाईल?
या भरतीसाठी उमेदवारांची निवड करण्याकरिता त्यांच्या अर्जाची स्क्रीनिंग आणि त्यानंतर संगणक आधारित परीक्षा घेतली जाईल व त्या आधारे निवड केली जाणार आहे.

किती लागेल शुल्क?

या भरतीसाठी उमेदवारांना 295 शुल्क भरावे लागणार असून एससी/ एसटी/ पीडब्ल्यूबीडी/ माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आलेली आहे.

कुठली कागदपत्रे लागतील?

या भरती करता उमेदवाराकडे पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो, उमेदवाराची स्वाक्षरी, जात प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र( लागू असल्यास), जन्म प्रमाणपत्र, एसएससी पास प्रमाणपत्र, उमेदवाराचे सर्वांचे शैक्षणिक पात्रता असलेले प्रमाणपत्र आणि अपंगत्व प्रमाणपत्र( लागू असल्यास) अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक इच्छुक व पात्र उमेदवारांना या भरती करिता अर्ज करायचा असेल ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत अर्ज करू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe