जेव्हा आपण बाईक खरेदी करायचा विचार करतो तेव्हा प्रामुख्याने त्या बाईकची किंमतीचा विचार प्रामुख्याने प्राधान्याने केला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्या गाडीचा मायलेज आणि मेंटेनन्स किती आहे याचा प्रामुख्याने विचार करत असतो.
या तीनही बाबी जेव्हा आपल्या बजेटमध्ये किंवा आपल्याला आवडतात तेव्हाच आपण बाईक खरेदी करायला पसंती देत असतो. त्यासोबतच त्या बाईकचा लूक स्टायलिश असणे आणि आरामदायी राईड यासारखे वैशिष्ट्ये असणे देखील गरजेचे असते.
जर आपण या वैशिष्ट्ये असलेल्या बाईकचा विचार केला तर हिरो स्प्लेंडर आतापर्यंत शेतकऱ्यांपासून तर मोठ्या शहरातील लोकांपर्यंत पसंतीचे राहिलेली आहे. जर आपण नोव्हेंबर महिन्याची आकडेवारी पाहिली तर स्प्लेंडर ही सर्वाधिक विक्री होणाऱ्या दुचाकींपैकी एक आहे.
परंतु यामध्ये स्प्लेंडर सारखेच विक्री होणारी व वार्षिक आधारावर विचार केला तर विक्रीत 1000% पेक्षा जास्त वाढ झालेली एक हिरोची बाईक आहे व ती म्हणजे हिरो पॅशन ही होय. या बाईकच्या विक्रीमध्ये सध्या खूप मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून एकूण नोव्हेंबर 2022 मध्ये तब्बल 2740 युनिट्स विक्री झाल्या होत्या.
परंतु यावर्षी या बाईकच्या विक्रीमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली असून नोव्हेंबर 2023 मध्ये या बाईकचे तब्बल 34,750 युनिट्स विक्री झालेले आहेत. या आकडेवारीवरून आपल्या लक्षात येते की हिरो पॅशन ग्राहकांच्या खूप पसंतीस उतरलेली आहे. व यामागे कारणे देखील तसेच आहेत.
हिरो मोटोकॉर्पच्या पॅशन प्लस मध्ये काय आहेत नवीन वैशिष्ट्ये
हिरो मोटोकॉर्प या कंपनीने पॅशन प्लस ही भारतीय बाजारपेठेमध्ये नव्या अवतारात लॉन्च केली असून ही बाईक नवीन डिझाईन मध्ये लॉन्च करण्यात आलेली असून रायडर्स साठी युटिलिटी व कम्फर्ट फॅक्टरमध्ये या नवीन डिझाईनमध्ये वाढ करण्यात आलेली आहे.
ही बाईक पॅशन प्लस आणि पॅशन XTEC या दोन मॉडेलचा समावेश असून यातील पॅशन प्लस मध्ये 97.2 सीसीचे इंजिन आहे तर पॅशन XTEC मध्ये 113.2 सीसीचे इंजिन आहे. यामध्ये नवीन हिरो पॅशन प्लसमध्ये काही जुने वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आलेले असून ती बऱ्याच प्रमाणात जुन्या मोटर सायकलची समकालीन आहे.
परंतु आता या नवीन पुनर आगमन केलेल्या पॅशन प्लसमध्ये स्टायलिश लूक देण्यात आलेला असून ग्राफिक्समध्ये देखील सुधारणा करण्यात आलेले आहेत.
किती आहे या दोन्ही मॉडेलची किंमत?
यामध्ये पॅशन प्लसची किंमत पाहिली तर ती 77 हजार 951 रुपये( एक्स शोरूम दिल्ली ) इतकी असून पॅशन XTEC या मॉडेलची किंमत 85 हजार 438 रुपये( एक्स शोरूम दिल्ली) पासून सुरू होते.