Internet Boost Tips : मोबाईलमध्ये फक्त एक सेटिंग करा ! इंटरनेट चालेल सुपरफास्ट

Ajay Patil
Published:
Internet Boost Tips

Internet Boost Tips:- सध्या इंटरनेटचा जमाना असून आता 5G इंटरनेट स्पीडचा जमाना आला असून फार मोठ्या प्रमाणावर वेगवान इंटरनेट आता उपलब्ध झालेले आहे. सध्या प्रत्येक व्यक्तीकडे 4G आणि 5G स्मार्टफोन आहेत. कारण वाढत्या गरजा आणि तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये आपल्याला अद्ययावत अशा फोनची गरज आहे.

तसेच आपल्याला माहित आहे की आता बहुतेक कामे इंटरनेटच्या माध्यमातून केली जातात व त्याकरिता इंटरनेटचा स्पीड खूप महत्वाची भूमिका पार पाडत असतो. आता 5G आल्यानंतर डाउनलोडिंग आणि अपलोडिंग मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वेग आलेला आहे.

परंतु ही सुविधा काही मोजक्या ठिकाणी सुरू झालेली असून अजून देखील बरेच लोक या सुविधेचा लाभ घेऊ शकत नाहीत. परंतु तुम्हाला देखील जर 5G इंटरनेटचा वापर करायचा असेल तर तुम्हाला फोनमध्ये महत्त्वाच्या सेटिंग्स करणे गरजेचे आहेत. ज्यामुळे तुमच्या मोबाईलमध्ये इंटरनेट एखाद्या रॉकेट प्रमाणे धावेल.

वेगाने इंटरनेट चालण्यासाठी फोन मध्ये ही सेटिंग करा

तुम्हाला देखील मोबाईल फोन मध्ये 5G नेटवर्क आहे परंतु ते तुम्हाला व्यवस्थित वापरता येत नसेल तर त्याकरिता तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये काही महत्त्वपूर्ण सेटिंग मध्ये बदल करावे लागतील. याकरिता सगळ्यात अगोदर तुम्हाला…

1- तुमच्या स्मार्टफोनच्या नेटवर्क सेटिंग मध्ये जावे.

2- त्या ठिकाणी असलेल्या 5G किंवा ऑटो म्हणून प्रिफर्ड टाईप ऑफ नेटवर्क निवडावे लागेल.

3- त्यानंतर नेटवर्क सेटिंग मध्ये एक्सेस पॉईंट नेटवर्क(APN) सेटिंग तपासा. कारण इंटरनेट वेगाकरिता योग्य एक्सेस पॉईंट नेटवर्क सेटिंग असणे गरजेचे आहे.

4- याकरिता APN सेटिंग्स मेनुवर जा आणि सेटिंग डिफॉल्टरवर सेट करा.

5- याशिवाय तुम्ही सोशल मीडिया ॲप्स जसे की इंस्टाग्राम, फेसबुक किंवा एक्स वापरत असाल तर ते देखील इंटरनेटचा स्पीड कमी करतात का हे तपासून पाहणे गरजेचे आहे. कारण हे ॲप्स जास्त प्रमाणात डेटा वापरू शकतात.

6- याकरिता तुम्हाला डेटा सेव करण्याकरिता या ॲपच्या सेटिंगमध्ये जाऊन ऑटो प्ले व्हिडिओ बंद करावा लागेल व स्मार्टफोनचा ब्राउझर डेटा सेव मोड मध्ये सेट करावा लागेल.

या वर उल्लेख केलेल्या छोट्या स्टेप्स फॉलो केल्या तरी तुम्हाला चांगला इंटरनेट स्पीड मिळत नसेल तर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची नेटवर्क सेटिंग पुन्हा रिसेट करा. या छोट्या स्टेप्स तुम्ही फॉलो केल्या तरी तुम्हाला इंटरनेट वेगात चालवता येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe