पारनेर – तालुक्यातील अपघूप भागातील खंडेश्वर मंदिरात १२ मे रोजी १२ च्या सुमारास एका १८ वर्ष पूर्ण न झालेल्या अल्पवयीन मुलीचा तिने वय १८ वर्ष पूर्ण झालेले नाही हे माहीत असतानासुद्धा तिचे आई – वडील व मुलांकडच्यांनी विवाह लावला.
याप्रकरणी काल मुलीचे वृद्ध नातेवाईक विश्न शिवराम गवळी , वय ६८, रा. अपधूप , ता. पारनेर यांच्या फिर्यादीवरुन आरोपी विकास बबन कोल्हे, विकास बबन कोल्हेचे वडील, रा. थोल्हेगाव, ता. नगर, नवनाथ कचरू गवळी, अनिता नवनाथ गवळी, दोघे रा. अपधूप, ता. पारनेर,

मुलीचे आई वडील यांच्याविरुद्ध भादवि कलम बालविवाह प्रतिबंध अधिनियम २००६ चे कलम ९, १०, ११ प्रमाणे सुपा पोलिसांत गुन्हा १३१ दाखल करण्यात आला असून राजेंद्र भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. पो ना शिंदे हे पुढील तपास करीत आहेत.
- राजधानी दिल्लीहून ‘या’ तीन शहरांसाठी सुरू होणार वंदे भारत स्लीपर ! दिवाळीच्या आधीच प्रवाशांना मिळणार भेट, महाराष्ट्राला मान मिळणार का ?
- 30 गुंठ्यात 9 लाख रुपयांच उत्पन्न ! अहिल्यानगरच्या शेतकऱ्याने करून दाखवलं, आल्याच्या शेतीने बनवलं मालामाल
- मारुती स्विफ्ट खरेदी करणाऱ्यांसाठी Good News ! Swift च्या किंमतीत आतापर्यंतची सर्वात मोठी कपात
- GST कपातीच्या निर्णयाचा सोने खरेदीदारांना मिळणार का लाभ ? सोन्यावर किती जीएसटी लागतो ?
- ‘या’ लोकांनी चुकूनही खाऊ नयेत वांगी ! वांगी खाण्याआधी त्याचे तोटे जाणून घ्या