Cibil Score Tips: सिबिल स्कोर खराब असल्यामुळे कर्ज मिळत नाही? वापरा ‘ही’ पद्धत मिळेल कर्ज

Ajay Patil
Published:
cibil score tips

Cibil Score Tips:- बरेचदा आपल्याला अचानकपणे मोठ्या प्रमाणावर पैशांची आवश्यकता भासते व तेव्हा आपण बँक किंवा एखाद्या वित्तीय संस्थेच्या माध्यमातून उद्भवलेली आर्थिक गरज भागवण्याकरिता कर्ज मिळवण्यासाठी अर्ज करतो किंवा कर्ज मागतो.

परंतु यामध्ये बँकांच्या माध्यमातून किंवा वित्तीय संस्थांच्या माध्यमातून तुमचा सिबिल स्कोर सगळ्यात अगोदर तपासला जातो. मागील काळातील काही कर्जामुळे किंवा इतर काही गोष्टींमुळे जर तुमचा सिबिल स्कोर घसरलेला किंवा खराब असेल तर अशा स्थितीमध्ये तुम्हाला बँक किंवा वित्तीय संस्थांकडून कर्ज नाकारले जाते.

त्यामुळे अशा परिस्थितीत खूप मोठी समस्या निर्माण होते. त्यामुळे मनामध्ये नक्कीच विचार येतो की आता अशी कुठली पद्धत वापरता येईल की ज्यामुळे आपल्याला सिबिल स्कोर खराब असताना देखील बँक किंवा वित्तीय संस्थेच्या माध्यमातून कर्ज मिळू शकेल. अगदी याच संबंधीची महत्त्वाची माहिती आपण या लेखात बघणार आहोत.

 या पद्धतींचा अवलंब करा आणि खराब सिबिल असताना देखील कर्ज मिळवा

1- सह स्वाक्षरीदार किंवा हमीदराची मदत घेऊन जर तुमचा क्रेडिट स्कोर खराब असेल तर तुम्ही सह स्वाक्षरीदार किंवा हमीदाराची मदत घेऊन कर्ज मिळवू शकतात. याकरिता जर तुम्ही सह स्वाक्षरीकर्त्याची मदत घेतली व कर्जासाठी अर्ज केला तर बँकेच्या माध्यमातून तुमच्या क्रेडिट स्कोरचा विचार केला जातो

व त्याचप्रमाणे ग्यारंटी असल्यास आपण कर्जाच्या पेमेंटमध्ये कोणत्याही प्रकारची अनियमितता करणार नाही असा बँकेचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. त्यामुळे ही पद्धत तुम्हाला क्रेडिट स्कोर खराब असताना देखील कर्ज मिळवून देऊ शकते.

2- एखादी मालमत्ता गहाण ठेवून क्रेडिट स्कोर जर खराब असेल व तुम्हाला जर कर्जाची आवश्यकता असेल तर तुम्ही एखादी मालमत्ता गहाण ठेवून वैयक्तिक कर्ज या माध्यमातून मिळवू शकतात. यामध्ये अशी गहाण मालमत्ता जामीनदारासारखे काम करते. याकरिता तुम्हाला काही मालमत्ता बँकेकडे तारण ठेवणे गरजेचे असते जी तुमच्या कर्जासोबत जोडली जाते.

3- सॅलरी स्लिप दाखवून यातील सगळ्यात महत्त्वाचा एक तिसरा पर्याय म्हणजे समजा तुम्ही नोकरी करत असाल व तुम्हाला सॅलरी स्लिप मिळत असेल तर तुम्ही तुमच्या पगाराची स्लिप म्हणजेच सॅलरी स्लिप बँकेला दाखवून कर्ज घेऊ शकतात.

जर तुम्ही एखाद्या चांगल्या कंपनीमध्ये नोकरी करत असाल तरी बँका तुम्हाला सॅलरी स्लिप दाखवल्यावर सहजपणे कर्ज मंजूर करतात. परंतु यामध्ये लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे जर तुम्ही पूर्ण वेळ नोकरी करत असाल तर अशा व्यक्तींसाठी ही पद्धत खूप फायद्याची आहे.

त्यामुळे जर सिबिल स्कोर घसरलेला असेल तर तुम्ही या तीनही पद्धती एका पद्धतीचा वापर करून कर्ज मिळवू शकतात.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe