गेल्या अनेक दिवसांचा विचार केला तर राज्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या असलेल्या विविध मागण्यांकरिता आक्रमक पवित्र धारण केल्याचे सध्या दिसून आले आहे. त्यानंतर शिंदे सरकारने मंगळवारी जी काही मंत्रिमंडळाची बैठक घेतली यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय अंगणवाडी सेविकांच्या बाबतीत घेण्यात आले.
यातील एक महत्त्वाचा निर्णय म्हणजे राज्यातील ज्या काही 13011 मिनी अंगणवाड्या आहेत त्या अंगणवाडी सेविकांचे श्रेणीवर्धन होऊन त्यामध्ये आता अंगणवाडी सेविका होणार आहेत. एवढेच नाही तर 13,011 अंगणवाडी मदतनीस पदे नव्याने निर्माण केली जाणार आहेत.
![anganwadi sevika](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/12/ahmednagarlive24-a-219.jpg)
याशिवाय मुख्य सेविका पर्यवेक्षिका यांचे 520 पदे नव्याने निर्माण केले जाणार असून या 13011 मिनी अंगणवाड्यांना नियमित अंगणवाडी प्रमाणे प्रशासकीय व इतर खर्चास देखील मान्यता देण्यात आली आहे. अशा पद्धतीचे निर्णय घेऊन राज्य सरकारच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना येणारे नववर्षाची भेटच दिली असे म्हणण्याला हरकत नाही.
अंगणवाडी सेविकांना मिळणार राज्य शासनाच्या वतीने अँड्रॉइड मोबाईल
दुसरे महत्त्वाचे म्हणजे जर आपण अंगणवाडी सेविकांचे काम पाहिले तर त्यांना अनेक वेगवेगळ्या प्रकारची कामे करायला लागतात. यामध्ये त्यांना अनेक शासकीय कामे करावी लागतातच.परंतु अंगणवाडी मधील लहान मुलांची माहिती मोबाईलचा वापर करून त्यांच्या वरिष्ठांना कळवणे देखील महत्त्वाचे असते.
या दृष्टिकोनातून अंगणवाडी सेविकेकडे अँड्रॉइड मोबाईल असणे गरजेचे असते. या अनुषंगाने अंगणवाडी सेविकांना शासनाच्या माध्यमातून मोबाईल देण्यात यावी अशा पद्धतीची देखील मागणी गेल्या कित्येक दिवसापासून केली जात होती. परंतु आता ही देखील मागणी राज्य शासनाच्या माध्यमातून पूर्ण करण्यात येणार आहे.
जर आपण राज्याचा विचार केला तर राज्यांमध्ये एकूण एक लाख 8 हजार अंगणवाडी सेविका आहेत. या सगळ्या अंगणवाडी सेविकांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या वतीने आता लवकरच अँड्रॉइड मोबाईल देण्यात येणार असून जवळपास अँड्रॉइड मोबाईलची किंमत 11 हजार रुपये पर्यंत असणार आहे.
म्हणजेच आता अंगणवाडी सेविकांना मोबाईल मिळाल्यामुळे त्यांना शासकीय कामे तसेच लहान मुलांची माहिती व इतर अंगणवाडी संबंधित महत्त्वाची कामे या मोबाईलच्या माध्यमातून सहजरीत्या करता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे आता शासनाच्या या निर्णयामुळे अंगणवाडी सेविकांना फार मोठा दिलासा मिळणार आहे.