पारनेर :- तालुक्यातील पाडळी तर्फे कान्हुर येथील तन्मय धोंडीभाऊ सुंबे वय 9 वर्षे, या बालकाचा पाण्याच्या टाकीमध्ये पडुन दुर्दैवी मृत्यू झाला.
या बाबत सविस्तर माहिती अशी की तन्मय सुंबे हा अत्यंत हुशार व गुणी विद्यार्थी होता. गोरेगाव येथील मंथन पब्लिक स्कूल मध्ये इयत्ता तिसरीचे शिक्षण घेऊन तो चौथी इयत्ता मध्ये गेला होता.

उन्हाळ्याची सुट्टी असल्यामुळे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास पाण्याच्या टाकी मध्ये पोहण्यासाठी गेला होता. परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला.
काही वेळानंतर तन्मय हा घरात नसल्यामुळे आई व आजी यांनी त्याचा शोधा शोध करण्यास सुरूवात केली.
काही वेळातच पाण्याच्या टाकी मध्ये मृत्य अवस्थेत त्याचा मृतदेह पहावयास मिळाला. यानंतर सायंकाळी सात वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.
- जमीन, प्लॉटच्या खरेदी-विक्री बाबत मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल ! व्यवहाराला बसण्याआधी न्यायालयाचा निकाल समजून घ्या
- LIC Policy: एलआयसीची ‘ही’ पॉलिसी घ्या आणि हॉस्पिटलच्या बिलची चिंता सोडा! बघा ए टू झेड माहिती
- सर्वसामान्यांसाठी गुड न्यूज ! आता टाटा कंपनीचे ‘हे’ बॅटरी इन्व्हर्टर मिळणार फक्त 1100 रुपयात, 3 दिवसांचा बॅकअप
- GST Rate: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! ट्रॅक्टर खरेदीवर करता येईल 63 हजार रुपयापर्यंत बचत…कसे ते वाचा?
- Ladki Bahin yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदवार्ता! ऑगस्टच्या हप्त्यासाठी 344 कोटींचा निधी वितरीत…. कधी येतील खात्यात पैसे?